Aslam Shanedivan
राज्य सरकारने नुकताच 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर मंगळवारी पुन्हा 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यात साखर आयुक्त कुणाल खेमणार यांचा देखील समावेश असून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असतानाच ही बदली करण्यात आली आहे.
कुणाल खेमणार यांच्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे
दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची ‘सिडको’च्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर बदली करण्यात आली आहे
यामुळे सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी आता सनदी अधिकारी अशोक काकडे यांच्याकडे असणार आहे
अशोक काकडे यांनी ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले असून आज (ता.12) ते पदभार स्वीकारणार आहेत.
याआधी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. त्याआधी ते नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
तसेच अनमोल सागर यांची बदली भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त म्हणून करण्यात आली असून ते लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.