Supreme Court : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह वाद, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

Akshay Sabale

न्यायालयात सुनावणी -

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

Supreme Court | sarkarnama

नाव कायम ठेवणार -

या वेळी पुढील आदेश येईपर्यंत 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव कायम राहणार, असा आदेश न्यायालयानं दिला.

Supreme Court | sarkarnama

सिंघवींनी केला युक्तिवाद -

शरद पवार गटाच्या वतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

abhishek manu singhvi | sarkarnama

तात्पुरतं नाव दिलं -

सिंघवी म्हणाले, आता विशेष अधिवेशन आहे. आयोगानं आम्हाला तात्पुरते नाव दिलं आहे. काही दिवसांत अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.

abhishek manu singhvi | sarkarnama

चिन्हाशिवाय राहू शकत नाही -

नंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. त्यामुळे नाव आणि चिन्हाशिवाय आम्ही राहू शकत नाही.

abhishek manu singhvi | sarkarnama

नाव अन् चिन्ह कायम ठेवा -

आम्हाला दिलेलं नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या, असा युक्तिवाद सिंघवींनी केला.

abhishek manu singhvi | sarkarnama

आयोगाकडे अर्ज करा -

यावर न्यायालयानं म्हटलं की, शरद पवार गटानं चिन्हासाठी रितसर आयोगाकडे अर्ज करावा.

Supreme Court | sarkarnama

आठवड्यात चिन्ह द्या -

आयोगानं मागणीनंतर शरद पवार गटाला एक आठवड्यात चिन्ह द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Supreme Court | sarkarnama

तीन आठवड्यांनंतर सुनावणी -

या प्रकरणी पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

R

Supreme Court | sarkarnama

NEXT : चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले मालवीय यांच्या हाती 'कमळ'; सरपंच ते खासदार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा