Thackeray Brothers Campaign : 'ठाकरे ब्रँड' मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कसा उडणार प्रचाराचा धुराळा? जाणून घ्या, एकाच क्लिकवर

Deepak Kulkarni

ठाकरे बंधू एकत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी सक्तीकरणाविरोधात एकत्र आले, तेव्हापासून ते मुंबईच्या राजकारणात एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Uddhav-Thackeray | Sarkarnama

18 वर्षांचे राजकीय मतभेद मिटले

अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपलं 18 वर्षांचं राजकीय मतभेद मिटवून मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

Uddhav-Thackeray | Sarkarnama

मनसेकडून जोरदार तयारी...

विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनीही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय उचलून धरत महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

raj thackeray | Sarkarnama

आदित्य अन् अमित ठाकरेंकडे धुरा

महापालिका निवडणुकीच्या शिवसेना आणि मनसेच्या प्रचाराची धुरा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

BMC Election | Sarkarnama

संयुक्त मुलाखत

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

Uddhav-Thackeray-And-Raj-Thackeray | Sararnama

दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 4 जानेवारी रोजी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. या वचननाम्यानंतर दोन्ही बंधु प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार आहे.

Uddhav-Thackeray-And-Raj-Thackeray | Sarkarnama

तीन सभा

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रचाराचा नारळ 6 जानेवारी रोजी फुटणार आहे. ठाकरे बंधूंच्या तीन संयुक्त सभा होत असून पहिली सभा 6 जानेवारी पूर्व उपनगरात, दुसरी सभा पश्चिम उपनगरात आणि तिसरी सभा मुंबईत होणार आहे.

Uddhav-Thackeray-And-Raj-Thackeray | Sarkarnama

कितपत फायदा होणार

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कितपत फायदा होणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना 164 जागांवर, मनसे 53 तर राष्ट्रवादी 11 जागा लढवत आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

NEXT: धक्कादायक! राज्य सरकारची कर्जमाफी रणनीती उघड? 'हे' शेतकरी ठरणार अपात्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver | Sarkarnama
येथे क्लिक करा...