Shivani Raja : ब्रिटनच्या संसदेत भगवद्गगीता; शिवानी राजा यांचं का होतंय कौतुक?

Rajanand More

शिवानी राजा

शिवानी राजा या भारतीय वंशाच्या ब्रिटनमधील खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय.

Shivani Raja | Sarkarnama

विजय ठरला खास

शिवानी यांचा विजय खास ठरला आहे. त्यांनी विजय मिळवलेल्या लिसेस्टर ईस्ट मतदारसंघात कंजर्व्हेटिव्ह पक्षाला 37 वर्षांनी विजय मिळाला आहे. हा मतदारसंघ लेबर पक्षाचा गड होता.

Shivani Raja | Sarkarnama

माजी उपमहापौरांचा पराभव

शिवानी यांनी लंडनचे माजी उप महापौर व लेबर पक्षाचे नेते राजेश अग्रवाल यांचा सुमारे चार हजार मतांनी पराभव केला आहे.

Shivani Raja | Sarkarnama

संसदेत भगवद्गीता

संसदेत सदस्यत्वाची शपथ घेताना शिवानी यांनी भगवद्गीतेवर हात ठेवला होता. त्यामुळे त्यांचे भारतभर कौतुक होत आहे.

Shivani Raja | Sarkarnama

तरुण खासदार

शिवानी या ब्रिटन संसदेतील तरूण महिला खासदार ठरल्या आहेत. त्या २९ वर्षीय आहेत.

Shivani Raja | Sarkarnama

मुळच्या गुजराती

शिवानी या भारतीय वंशाच्या, गुजराती व्यावसायिक आहेत. त्यांचे आई-वडील १९७० मध्ये केनियातून ब्रिटनमध्ये आले होते.

Shivani Raja | Sarkarnama

उच्चशिक्षित

मोंटफोर्ट विद्यापीठातून फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर अनेक प्रसिध्द कॉस्मेटिक ब्रँडसोबत काम केले.

Shivani Raja | Sarkarnama

कौटूंबिक व्यवसाय

शिवानी या ब्रिटनमध्ये कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांनी लिसेस्टरमध्ये झालेल्या दंगलीनंतर 2022 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

Shivani Raja | Sarkarnama

NEXT : प्रेरणादायी! पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण, तेही 'टॉप 10' मध्ये तिसरी रँक मिळवत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा