Rashmi Mane
UPSC 2027 ची तयारी करताय? मग चालू घडामोडींचा अभ्यास योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. किती महिन्यांच्या बातम्या वाचायच्या आणि रिव्हिजन कसे करायचे, जाणून घ्या.
UPSC साठी साधारणपणे परीक्षेपूर्वीच्या 12 ते 18 महिन्यांतील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास उपयुक्त ठरतो. मात्र, हा ठरलेला नियम नाही. बातम्यांचा संबंध अभ्यासक्रमाशी जोडून समजून घ्या.
प्रिलिम्ससाठी मागील 12 महिन्यांतील महत्त्वाच्या घटना, सरकारी योजना, पर्यावरण, विज्ञान-तंत्रज्ञान, अहवाल आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करा.
मेन्समध्ये केवळ बातम्या लक्षात ठेवून चालत नाही. एखाद्या विषयाची कारणे, परिणाम, आव्हाने आणि संभाव्य उपाय समजून घ्या. उत्तरलेखनाचा सरावही करा.
दररोज एक विश्वासार्ह वर्तमानपत्र वाचा. प्रत्येक बातमीची नोंद करण्याऐवजी UPSC अभ्यासक्रमाशी संबंधित मुद्दे निवडा आणि थोडक्यात नोट्स तयार करा.
महिन्याच्या शेवटी वाचलेल्या घडामोडींची उजळणी करा. वारंवार स्रोत बदलण्यापेक्षा मर्यादित अभ्याससाहित्य वापरा. नियमित प्रश्न सोडवून स्वतःची तयारी तपासा.
UPSC च्या दिलेल्या वेळापत्रकानुसार, प्रिलिम्स 23 मे 2027 रोजी होणार आहे. परीक्षेची अधिसूचना 13 जानेवारी 2027 रोजी प्रसिद्ध होईल, तर अर्जाची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2027 आहे.
UPSC 2027 ची मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आतापासूनच चालू घडामोडी, अभ्यासक्रम, नोट्स आणि नियमित रिव्हिजन यांचा समतोल साधा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.