Aslam Shanedivan
जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
जगभरात अशा अनेक लव्हस्टोरी आहेत ज्यांची चर्चा होते. अशीच चर्चा सध्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होताना दिसत आहे.
ही लव्हस्टोरी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या पत्नी सोनम यांची आहे.
मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या पत्नी सोनम यांची पहिली भेट 2006 मध्ये झाली. येथेच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. ज्याच आधी मैत्री आणि नंतर प्रेम झाले.
या लव्हस्टोरीची आठवण सांगताना सोनम म्हणतात की, आमच्यात मैत्री होती आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. आमच्या लग्नाला घरच्यांचा काही विरोध नव्हता. आम्ही दोघेही सेटल झालो होतो. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
तसेच आयएएस होण्याआधी एका ठिकाणी नोकरी करत होते. पण त्यानंतर अभ्यास करून आयएएस झाले.
आयुक्त जी. श्रीकांत आणि त्यांच्या पत्नी सोनम गेल्या 19 वर्षांपासून एकमेकांच्या सोबत असून त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. ज्याच सोनमने खूप साथ दिल्याचे जी. श्रीकांत सांगतात.
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जी. श्रीकांत यांनी तरुणाईला सल्ला देताना, जे काही करायचं आहे त्यासाठी आधी स्वत: तयार व्हा, करिअर सेट करा मग अडचणींचा सामना करावा लागणार नाही असे म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.