Aslam Shanedivan
रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली.
रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वनश्री समीर शेडगे यांनी 4 हजार 695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्या पहिल्या थेट महिला नगराध्यक्षा ठरल्यात.
नऊ वर्षांपूर्वी अवघ्या सहा मतांनी हुकलेले वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे स्वप्न अखेर वनश्री शेडगे यांनी पूर्ण केले
2016 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून वडील समीर शेडगे यांनी निवडणूक लढवली.पण त्यांचा केवळ 6 मतांनी पराभव झाला होता.
या पराभवानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरेंबोसत राहीले. मात्र ऐन निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या निवडणुकीत वनश्री यांनी 8 हजार 586 मते घेत विरोधातील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमदेवार शिल्पा धोत्रे यांचा पराभव केला. त्यांना 3 हजार 891 मते मिळाली.
या विजयानंतर बाप-लेकीला अश्रू अनावर झाले. तर एकमेकांना मिठी मारत त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.