Deepak Kulkarni
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना लंडन दौऱ्यावर असताना तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
शिंदे यांनी हे पुरस्कार स्विकारतानाच इंग्लिशमध्ये भाषण केल्याचंही दिसून आलं. याचदरम्यान, लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनं त्यांची भेट घेतली.
या भेटीत दोघांवर अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच विराटचं कौतुकही केलं.
एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, आपण लंडनमध्ये असल्याचं समजल्यानंतर विराट स्वतःहून भेटण्यासाठी आला होता.
शिंदे हे या भेटीदरम्यान, विराटच्या साधेपणानं अगदी भारावून गेले. त्यांनी विराटला 'किंग' म्हटले
शिंदेंनी या भेटीमध्ये महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा करताना अटल सेतू, समृद्धी महामार्ग, तिसरी मुंबई, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजनांची माहिती कोहलीला दिली.
शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर अधिक भर देण्याची सूचना विराटने केली.
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराटने या भेटीदरम्यान, सरकारच्या क्रीडा उपक्रमांना मदत करण्यास तयार असल्याचंही सांगितलं. विराट काही क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहकार्य करू शकतो, असे शिंदे यांनी सांगितले.
तर शिंदेंनी एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराट हा किती साधा आणि नम्र आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. याआधीसुद्धा आम्ही भेटलो होतो पण यावेळी निवांत आणि चांगला संवाद झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.