Jagdish Patil
सध्या इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही देश आमनेसामने आले आहेत.
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर 180 क्षेपणास्त्रे डागल्यामुळे या दोन्ही देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या दोन देशात युद्ध झालं तर त्याचा परिणाम जगासह भारतावरही होणार आहे. तर भारत इराणकडून काय घेतो आणि निर्यात काय करतो ते जाणून घेऊया.
भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. या देशांत दरवर्षी कोट्यवधींचा व्यापार होतो.
भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करतो. मात्र, अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यानंतर त्यात घट झाली आहे.
भारत दरवर्षी इराणमधून सुका मेवाही मोठ्या प्रमाणात आयात करतो.
भारत इराणकडून रसायने आणि काचेची भांडीही मोठ्या प्रमाणात खरेदी करतो.
भारत इराणला बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. 2014-15 या आर्थिक वर्षात इराण हा भारतीय तांदळाचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश ठरला.
2022-23 या आर्थिक वर्षात भारताने इराणला 9,98,979 मेट्रिक टन बासमती तांदूळ निर्यात केला. यासह भारत इराणला चहा, कॉफी आणि साखर निर्यात करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.