Today Historical Events : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!

Rashmi Mane

1845 - मुंबईत ग्रॅंट मेडिकल कॉलेजचा प्रारंभ. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फी नसे. उलट निवडक विद्यार्थ्यांना पगार दिला जात असे. ज्यांची पगारासाठी निवड होत नसे , त्यांना मोफत शिक्षण दिले जाई.

1950 - आगगाडीची इंजिने बनविणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स या कारखान्याचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्‌घाटन.

1976 - गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील जोशी कुटुंबियांचा पुण्यात खून. हे खून करणाऱे राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, मुनव्वर शाह आणि शांताराम जगताप या चार आरोपींना नंतर फासावर लटकवण्यात आले.

1977 - "चिरॉन' हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात शास्त्रज्ञांना यश.

1979 - गुजरातमधील अंकलेश्वर येथील भारताच्या पहिल्या तेलविहीरीलगतच्या साठा केंद्राला भीषण आग

1981 - गुजरातच्या वेरावळ बंदराला चक्रीवादळाचा भीषण तडाखा

1994 - शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ , लाल निशाण पक्षाचे नेते आणि कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

1996 - श्रीलंकेचे माजी अध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांचे निधन. ते 1976 ते 88 या काळात श्रीलंकेचे पंतप्रधान तसेच अध्यक्ष होते.

Next : वंचित आघाडीची ट्रान्सजेन्डर 'ग्रेस' फुल उमेदवार ; श्याम ते शमिभा..., रावेर मतदारसंघाच्या रिंगणात 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा