Roshan More
सर्बियात तरुणाईची क्रांती
अलेक्झांडर वुचिच यांच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत करत विद्यार्थी आघाडीचा ऐतिहासिक विजय सर्बियाच्या निवडणुकीत झाला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये नोव्ही साद रेल्वे स्थानकाचे छत कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. सरकारी भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
विद्यार्थ्यांनी केवळ आंदोलन केले नाही, तर 'स्टुडंट लिस्ट' नावाची नवी राजकीय आघाडी स्थापन केली.कोणत्याही मुख्य नेत्याशिवाय तरुण, प्राध्यापक आणि नागरिकांनी ही लढाई एकत्र लढली.
गेल्या १५ वर्षांपासून सर्बियावर वर्चस्व गाजवणारे नेते अलेक्झांडर वुचिच यांनी पराभव मान्य केला. पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वुचिच यांना मतदारांनी नकार दिला.
अलेक्झांडर वुचिच सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी'या पक्षाचे नेते आहेत. नेता ते पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
अलेक्झांडर वुचिच यांनी यापूर्वी सर्बियाचे पंतप्रधान ( २०१४ ते २०१७) आणि २०१७ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष झाले.
वुचिच हे उजाव्या विचारसरणीचे नेते मानले जातात. सत्ता सांभाळताना त्यांनी सर्बियाला युरोपियन युनियनमध्ये (EU) सामील करण्याची भूमिका घेतली, तर दुसरीकडे रशिया आणि चीनसोबतचे पारंपरिक संबंधही मजबूत ठेवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.