Deepak Kulkarni
गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवादी संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या भूपती आत्मसमर्पणासाठी मोठे प्रयत्न केले जात होते.
भूपती हा नक्षलवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनचा छोटा भाऊ असून नक्षली चळवळीतील बौद्धिक चेहरा समजला जातो.
नक्षली संघटनांकडून करण्यात आलेल्या अनेक हिंसक कारवायांत भूपतीची मोठी भूमिका होती. त्यातही स्थानिक पातळी ते केंद्रीय समितीपर्यंत नक्षली चळवळ उभी करण्यात त्याची निर्णायक भूमिका राहिली आहे.
तब्बल 40 वर्षे नक्षलवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्य म्हणून काम पाहत होता.
विविध राज्यांनी त्याच्यावर 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस जाहीर केले होते. बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या भूपतीची नक्षलवादी चळवळीतील सर्वात जहाल नेता म्हणून ओळख आहे.
मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. त्यानं काही दिवसांपूर्वीच युद्धबंदी आणि आत्मसमर्पणाचे संकेत दिले होते. तेव्हाच नक्षलवादी संघटनेत फूट पडल्याचे पुढे आले होते.
भूपतीकडे नक्षलवादी चळवळीत गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भूपती शरण आल्यानंतर आता गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
भूपतीच्या शरणागतीनंतर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांची चळवळ मोडून काढण्यात मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठे यश आले आहे. गडचिरोलीत 20 वर्षांत 700 पेक्षा जास्त नक्षलवादी शरण आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.