Who Is Nayab Singh Saini : हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी कोण आहेत?

Akshay Sabale

खट्टरांचा राजीनामा -

मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाचा अचानक राजीनामा दिला.

manohar lala khattar | sarkarnama

सैनी नवे मुख्यमंत्री -

आता नायब सिंह सैनी यांची हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे.

nayab singh saini | sarkarnama

सैनी ओबीसी समाजाचे नेते -

कुरुक्षेत्र मतदारसंघाचे खासदार नायब सिंह सैनी हे ओबीसी समाजाचे नेते आहेत.

nayab singh saini | sarkarnama

भाजप प्रदेशाध्यक्ष -

सैनी यांची 2023 मध्ये ऑक्टोबरमध्ये हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

nayab singh saini | sarkarnama

कायद्याचे शिक्षण -

सैनी यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं.

nayab singh saini | sarkarnama

1996 मध्ये राजकीय कारकीर्द सुरू -

54 वर्षीय सैनी यांच्या भाजपमधील राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1996 मध्ये झाली.

nayab singh saini | sarkarnama

जिल्हा सरचिटणीस -

सुरुवातीला हरियाणातील संघटनात्मक बांधणीसाठी सैनी यांनी काम केलं. 2002 मध्ये ते अंबाला भाजप युवा आघाडीचे जिल्हा सरचिटणीस झाले.

nayab singh saini | sarkarnama

नारायणगडमधून आमदार -

2005 मध्ये सैनी यांची अंबाला जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. 2014 मध्ये नारायणगड मतदारसंघातून सैनी विधानसभेवर निवडून गेले.

nayab singh saini | sarkarnama

2016 मध्ये मंत्री -

2016 मध्ये सैनी यांची प्रथमच मंत्रिपदी नियुक्ती झाली.

nayab singh saini | sarkarnama

लोकसभेला निवडून आले -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सैनी यांनी कुरुक्षेत्र मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निर्मल सिंग यांचा 3.83 लाख मतांच्या फरकानं पराभव केला.

R

nayab singh saini | sarkarnama

NEXT : जून 2019 ते 2024 या काळात खासदारांनी किती प्रश्न विचारले, जाणून घ्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

sansad | sarkarnama
क्लिक करा