Soniya Doohan News : अजित पवार गटात जाण्याची चर्चा असलेल्या सोनिया दुहान कोण आहेत?

Akshay Sabale

राष्ट्रीय अध्यक्षा -

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Soniya Doohan | sarkarnama

चर्चांना उधाण -

यानंतर सोनिया दुहान कोण आहेत? या चर्चांना उधाण आलं आहे.

Soniya Doohan | sarkarnama

शरद पवारांच्या विश्वासू -

सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. सोनिया मूळच्या हरियाणाच्या रहिवाशी आहेत.

Soniya Doohan | sarkarnama

राष्ट्रवादीच्या संपर्कात -

बीएसस्सीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैमानिकाचं शिक्षण घेण्यासाठी सोनिया पुण्यात आल्या. तेव्हा, त्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आल्या.

Soniya Doohan | sarkarnama

राष्ट्रवादीचं नेतृत्व -

21 व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीसोबत काम करण्यास सुरूवात केली. दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं आहे.

Soniya Doohan | sarkarnama

शपथविधी अन् दुहान -

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळचा शपथविधी घेतला. तेव्हा, गायब झालेल्या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी दुहान यांच्यावर होती.

Soniya Doohan | sarkarnama

आमदारांना बाहेर काढलं -

सोनिया दुहान यांनी धीरज शर्मा यांच्या मदतीनं आमदारांना हॉटेलमधून खुबीनं बाहेर काढलं.

Soniya Doohan | sarkarnama

अटक -

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही गोव्यातल्या हॉटलेमध्ये शिरण्याचा दुहान यांनी प्रयत्न केला होता. पण, त्यांनी त्यावेळी अटक देखील करण्यात आली होती.

Soniya Doohan | sarkarnama

NEXT : निवडणुकीच्या धामधुमीत शिवराज सिंहांनी उरकला लेकाचा साखरपुडा; कोण आहे होणारी सून?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Riddhi Jain, Kunal Sivraj Singh Chouhan | Sarkarnama