Roshan More
रुपाली चाकणकरांच्या कट्टर विरोधक आणि पवार कुटुंबीयांच्या विश्वासू म्हणून परिचित असलेल्या वैशाली नागवडे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
अजित पवारांच्या विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.
२००५ मध्ये महानंदाच्या संचालिका तर, २००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली.
२००९ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच वर्षी महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
२०१३ मध्ये राज्याच्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी IVRI - बरेली , उत्तर प्रदेश या संस्थेच्या डायरेक्टर झाल्या.
दोन वर्षांपूर्वी पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
NEXT : कायदेशीर लढ्यानंतर अखेर दीड वर्षांसाठी मिळाली आमदारकी; कोण आहेत काँग्रेसच्या 'या' महिला नेत्या?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.