Deepak Kulkarni
एकनाथ शिंदेंनी चार वर्षांपूर्वी केलेल्या शिवसेनेतील बंडानंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंचा पक्ष फोडण्यात आला आहे.
यावेळी ठाकरेंकडील 9 पैकी 6 खासदार ऑपरेशन टायगरचे शिकार झाल्याची चर्चा आहे.त्यात धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचाही समावेश असल्यानं उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांनाही जबर धक्का बसला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांपैकी सोशल मीडिया,माध्यमं यांसह राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ओमराजेंचाच असल्याचं दिसून येत आहे.
ओम राजेनिंबाळकर यांची वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर अपघातीपणेच राजकारणात एन्ट्री झाली. विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत ते 26 व्या वर्षी पहिल्यांदा शिवसेनेकडून धाराशिव मतदारसंघातून आमदार झाले.
यानंतर उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत त्यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी मैदानात उतरवलं. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत दिल्ली गाठली.
मतदारसंघातील विकासकामांचा धडाका, 24 तास उपलब्ध, सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात उपस्थिती,दांडगा जनसंपर्क यांच्या जोरावर त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा जवळपास साडेतीन लाखांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला.
शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहत मराठवाड्यात मशाल धगधगती ठेवण्याचं मोठं काम त्यांनी केलं.
उद्धव ठाकरेंचाही प्रचंड विश्वास असलेला नेता आणि त्यांचा कट्टर समर्थक खासदार म्हणून ओम राजेनिंबाळकर यांची ओळख आहे. कितीही मोठं संकट किंवा ऑफर विरोधकांनी दिली तरी ते फुटणार नाही असा विश्वास प्रत्येकाला होता.
ओम राजेनिंबाळकरनी एका मुलाखतीत वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येनंतर या धाराशिवच्या जनतेनं आणि उद्धव साहेबांनी मला पदरात घेतलं, मला सांभाळलं असंही ते म्हणाले होते. आता त्यांनाच फोडताना केंद्रीय राज्यमंत्रिपद व भरघोस निधीची ऑफर त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.