Deepak Kulkarni
केंद्र सरकारनं पुन्हा एकदा रक्तदात्यांच्या संभाव्य यादीत तृतीयपंथी,पुरुषांशी संबंध ठेवणारे पुरुषांसह देहविक्रय करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना स्थान न देण्याच्या निर्णयाबाबतची रोखठोक भूमिका गुरुवारी (ता.12) सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.
केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आरोग्य मंत्रालयानं रक्तदात्यांच्या यादीतील समावेशाबाबत घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं.
रक्तदानाच्या प्रक्रियेतून वगळल्या जाणाऱ्या घटकांबाबतचा निर्णय हा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींकडून पुराव्यांच्या आधारे घेतलेला असतो, असंही आरोग्य मंत्रालयानं आपल्या प्रतिज्ञापत्रात अधोरेखित केलं आहे.
देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी व्यक्ती, पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष यांच्यात एचआयव्ही, हिपॅटायटीस B किंवा C संसर्गाचा धोका लक्षणीयरित्या असल्याचं निर्दशनास आणून देणारे काही पुरावे उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं मोठा दावा करतानाच देहविक्रेत्या महिला, तृतीयपंथी, पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवणारे पुरुष यांच्यात HIV संसर्गाचं प्रमाण प्रौढ व्यक्तींमधील प्रमाणापेक्षा 6 ते 13 पटीनं जास्त असल्याचं म्हटलं आहे.
हा दावा करतानाच मंत्रालयानं सरकारच्याच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या 2020-21च्या वार्षिक अहवालाचा संदर्भ दिला आहे. तसेच अनेक युरोपीय देशांत पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना रक्तदान करण्यापासून कायमस्वरुपी वगळण्यात येत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं आहे.
यापूर्वी थांगजाम संता सिंग यांनी 2017 च्या केंद्र सरकारच्या रक्तदात्यांच्या संभाव्य यादीतील निवडीच्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान दिलं होतं. त्यात तृतीयपंथी व्यक्ती, एमएसएम आणि देहविक्रेत्या महिलांना रक्तदानापासून वंचित ठेवणं हे असंवैधानिक रद्द करण्याची मागणी केली होती.
त्यात सिंग यांनी तृतीयपंथी व्यक्ती, एमएसएम आणि देहविक्रेत्या महिलांना रक्तदानापासून वंचित ठेवणं हे असंवैधानिक रद्द करण्याची मागणी केली होती.
सॉलिसिटर ऐश्वर्या भाटी यांनी देहविक्रेत्या महिला, तृतीयपंथी व्यक्ती, एमएसएम यांना रक्तदात्यांच्या यादीतून वगळण्याच्या निर्णयाचा मानवी हक्कांऐवजी सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगानं विचार करण्यात यावा असं न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर नमूद केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.