Rajanand More
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी उदय भानू चिब यांची युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
उदय हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली.
उदय भानू चिब हे जम्मू-काश्मीरमधील असून गुलाम नबी आझाद यांच्यानंतर पहिल्यांदाच काश्मीरमधील नेत्याकडे युवक काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे.
चिब हे काश्मीरमधील युवा नेतृत्व आहे. जम्मू-काश्मीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय युवक काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून काम केले आहे.
दहा वर्षांनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी चिब यांचे प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. तर दुसरीकडे राष्ट्रीय पद देत पक्षाने एकप्रकारे बक्षीस दिले.
निवडणुकीचा पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याऱ्या समितीत चिब यांना स्थान देण्यात आले होते. समितीने अनेक मोठ्या योजनांचा यामध्ये समावेश केला आहे.
चिब यांची राजकीय सुरूवात विद्यार्थी काँग्रेसमधून झाली. ते एनएसयूआयचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना युवक काँग्रेसमध्ये संधी मिळाली.
देशात पुढील काळात अनेक मोठ्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत युवक काँग्रेसला आपली ताकद दाखवून देण्याचे मोठे आव्हान असेल. त्यासाठी चिब यांंना पदाधिकाऱ्यांना सक्रीय करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.