पुण्यातील पोलिस वसाहतींच्या दोन इमारती सामाजिक संस्था बांधून देणार

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील दोन इमारती एक संस्था स्वखर्चाने बांधून देणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या गृहविभागाने एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे. रमा-पुरुषोत्तम फाऊंडेशन असे या संस्थेचे नांव आहे
Social Organsation to Build Two Buildings for Pune Police
Social Organsation to Build Two Buildings for Pune Police
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील दोन इमारती एक संस्था स्वखर्चाने बांधून देणार आहे. या प्रस्तावाला राज्याच्या गृहविभागाने एका आदेशाद्वारे मंजुरी दिली आहे. रमा-पुरुषोत्तम फाऊंडेशन असे या संस्थेचे नांव आहे. 

शिवाजीनगर पोलिस वसाहतीतील बैठ्या चाळी पाडून त्या ठिकाणी दहा इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यातून पोलिसांसाठी ८४० नवी सेवा निवासस्थाने निर्माण होतील. या प्रकल्प महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला पुणे महापालिकेची परवानगी २७ सप्टेंबर, २०१९ रोजी मिळाली आहे. 

यापैकी दोन इमारतील सामाजिक जबाबदारी म्हणून रमा- पुरोषोत्तम फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून एक संपूर्ण इमारत आणि दुसऱ्या इमारतीचे जोत्यापर्यंतचे बांधकाम स्वतःच्या खर्चाने बांधून देण्याचा प्रस्ताव पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे दिला होता. हा प्रस्ताव पोलिस महासंचालकांच्या मार्फत गृह विभागाला सादर करण्यात आला. आता गृह विभागाने त्याला मान्यता दिली आहे. हे बांधकाम एप्रील २०२१ पर्यंत पूर्ण करुन द्यायचे आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com