पोलिस अधिक्षक आरती सिंग पोहोचल्या अवघड हरिहर गडाच्या शिखरावर!

नाशिकच्या पोलिस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंग यांनी आज सकाळी मोठे आव्हान असलेल्या अन्‌ सरळ चढ, बिकट वाट असलेला हरिहर गड सर केला. त्याला कारण होते 'पोलिस रायझींग डे'
Nashik Police SP Aarti Singh Climbed Harihar Gadh
Nashik Police SP Aarti Singh Climbed Harihar Gadh

नाशिक : नाशिकची थंडी अन्‌ नऊ, दहा पर्यंत धुके अशी आजची स्थिती आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस म्हटल्यावर तर रजईतुन बाहेर निघायची इच्छा कोणाला होईल? मात्र नाशिकच्या पोलिस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंग यांनी याला छेद देत आज सकाळी मोठे आव्हान असलेल्या अन्‌ सरळ चढ, बिकट वाट असलेला हरिहर गड सर केला. त्याला कारण होते 'पोलिस रायझींग डे'. त्यांची ही ट्रेकींग मोहिम पोलिस दलातील साऱ्यांनाच प्रोत्साहन देणारी ठरली आहे. 

सह्याद्रीचे महत्वाचे शिखर असलेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या मागच्या बाजुला हा बिकट किल्ला आहे. हरिहर किल्ला सर करणे हे राज्यातील अनेक ट्रेकींग संस्था, गिर्यारोहकांना देखील आव्हान ठरले आहे. त्यामुळे अनेकांना त्याचे विशेष आकर्षण राहिले आहे. हा किल्ला सर करण्यासाठी पोलिस 'रायझींग डे' च्या निमित्ताने आरती सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची मानसिकता तयार केली होती. ॉ

त्यांच्या संकल्पनेतून हरिहर किल्ला सफरीचा कार्यक्रम ठरवला. शर्मिला धारगे- वालावकर यांसह परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली. पेट, त्र्यंबेकश्‍वर आणि इगतपुरी या तिन्ही तालुक्‍यांतली पोलिस अधिकारी त्याच्या आयोजनात पुढे आले व त्यात सहभागी झाले. त्यातून ही मोहिम फत्ते झाली. त्याचे समाधान या सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com