अकाेल्यात शिवसेनेची तगड्या उमेदवाराची शाेध माेहिम

सध्या शिवसेनेत अामदार गाेपीकिशन बाजाेरिया, डॉ. विनीत हिंगणकर, ॲड. अनिल काळे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणुन चर्चेत अाहेत. एेनवेळी शिवसेना उमेदवार ‘अायात’ करण्याची शक्यता असल्याने अागामी निवडणुकीत भाजपला सेनेच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता अाहे.
अकाेल्यात शिवसेनेची तगड्या उमेदवाराची शाेध माेहिम

अकाेला : अागामी लाेकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर सेनेत सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू झाली अाहे. गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकाेला लाेकसभा मतदारसंघात शिवसेना सक्षम उमेदवार उतरविण्याची रणनिती अाखत असून स्थानिक राजकारण लक्षात घेता सेना मराठा किंवा हिंदी कार्ड वापरण्याची शक्यता अाहे.

सध्या शिवसेनेत अामदार गाेपीकिशन बाजाेरिया, डॉ. विनीत हिंगणकर, ॲड. अनिल काळे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणुन चर्चेत अाहेत. एेनवेळी शिवसेना उमेदवार ‘अायात’ करण्याची शक्यता असल्याने अागामी निवडणुकीत भाजपला सेनेच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता अाहे. 

देशात 2014 मध्ये झालेल्या लाेकसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या भाजप-शिवसेनेत गेल्या तीन वर्षांपासून कुरघाेडीचे राजकारण उफाडून अाले अाहे. त्यातूनच दाेन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून एकमेकांवर अाराेप-प्रत्याराेपाच्या फेरी झाडण्यात येत असल्याने राजकीय वातावरण तापले अाहे. अागामी अागामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जाेरदार माेर्चेबांधणी करण्यात येत अाहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकावयचा असेल तर विदर्भ काबीज करणे अावश्यक अाहे. 

त्यामुळेच भाजपचे प्राबल्य असलेल्या विदर्भावर सेनेकडून 'फाेकस' केले जात अाहे. पश्चिम विदर्भात अमरावती, बुलडाणा अाणि यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार अाहेत तर अकाेला लाेकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात अाहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात भाजप मराठा कार्ड वापरत असून काँग्रेस अाणि भारिप बहुजन महासंघाच्या मतविभाजनाचा फायदा खासदार संजय धाेत्रे यांना मिळाला अाहे. मात्र, अागामी निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलाे रे’ चा नारा दिल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता अाहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपुर्वीच नागपूर येथे मतदारसंघनिहाय अाढावा घेऊन सक्षम उमेदवाराची चाचपणी केली. अकाेला लाेकसभा मतदारसंघात भाजपला टक्कर देण्यासाठी सामाजीक समीकरणात 'फिट' बसणाऱ्या अाणि अार्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवाराचा शाेध पक्षपातळीवर सुरू अाहे. जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे एकमेव अामदार म्हणुन गाेपीकिशन बाजाेरिया यांनी धुरा सांभाळली अाहे. 

अर्थकारणातही अामदार बाजाेरिया सक्षम असल्याने तगडा उमेदवार म्हणुन पक्ष नेतृत्व त्यांच्या नावाला प्राधान्य देऊ शकतात. सामाजीक समीकरण विचारात घेता मराठा चेहरा म्हणुन शिवसेनेचे पश्चिम विदर्भ कायदे विभाग प्रमुख ॲड. अनिल काळे, डॉ. विनीत हिंगणकर यांच्याही नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. सध्या सेनेकडून या नावाची चर्चा सुरू असली तरी एेनवेळी शिवसेना उमेदवार आयात करण्याची शक्यता असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले सुप्रसिद्ध डॉक्टर गळाला लावण्याची रणनिती सेनेकडून अाखली जात अाहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com