बुलडाण्याचे आमदार सपकाळ यांच्यावर काँग्रेस पक्षातर्फे गुजरातमध्ये मोठी जबाबदारी

harshavardhan-sapkal
harshavardhan-sapkal

बुलडाणा   : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुजरात निवडणुकीची मोठी जबाबदारी काँग्रेसने सोपविली आहे.

नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीचे घोळ, व्यापारी वर्गाचा रोष या सर्व पार्श्वभूमीवर गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच नुकतेच नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. 

काँग्रेसने गुजरात निवडणुकीसाठी अशोकसिंह गहलोत यांच्या नेतृत्वाखाली एक टीम सक्रिय केली आहे. यामध्ये सहप्रभारी म्हणून अामदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे . 

सुरतसह दक्षिण गुजरात परिसरातील 45 विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य उमेदवारांची निवड करणे, प्रचार यंत्रणा राबविणे, मोठ्या प्रचार सभांचे नियोजन करणे आदी जबाबदारी अामदार सपकाळ सांभाळत आहेत. 

एनएसयुअाय, युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून अामदार हर्षवर्धन सपकाळ विद्यार्थी, युवक चळवळीत सक्रीय हाेते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्या माध्यमातून ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या थेट संपर्कात अाले. त्यानंतर वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसची मजबुत बांधणीत अामदार सपकाळ यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली. 

त्यामुळे राहुल गांधी ब्रिगेडमध्ये महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव  अाणि हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली. जिल्हा परिषदेचे सदस्य, अध्यक्ष अाणि अामदार, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव म्हणून सर्वसामान्यांची कामे करून त्यांनी पक्षाची ध्येय-धाेरणे तळागाळापर्यंत पाेहचविण्याचे काम यशस्वीपणे केले अाहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ‘गुडबुक’ मध्ये अामदार सपकाळ अाहेत. 


त्यांच्यासह महाराष्ट्रातून खासदार राजीव सातव, आमदार वर्षाताई गायकवाड, मध्यप्रदेशचे आमदार जितू पटवारी हेदेखील वेगवेगळ्या मतदारसंघात जबाबदारी सांभाळत आहेत. विदर्भात अनेक दिग्गज नेते असताना सपकाळ यांनाच ही जबाबदारी देण्यात आल्याने अनेक काँग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com