विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या समितीत अकोल्यातून लक्ष्मणराव तायडे व डॉ.सुधीर ढोणे 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसने महाराष्ट्रासाठी विविध समित्यांना नुकतीच मान्यता दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी विविध समित्या जाहीर केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या समितीत अकोल्यातून लक्ष्मणराव तायडे व डॉ.सुधीर ढोणे 

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसने महाराष्ट्रासाठी विविध समित्यांना नुकतीच मान्यता दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी विविध समित्या जाहीर केल्या आहेत. या समितीत अकोला जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे व लक्ष्मणराव तायडे यांची नियुक्ती झाली आहे. 

विविध समित्यांवर राज्यातील माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी प्रदेश अध्यक्ष, राज्यातील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, खासदार व मोजक्या आमदारांचा व माजी मंत्र्यांचा या समितीत समावेश आहे.  समन्वय समितीच्या अध्यक्षपदी माजी मुखमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेश निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नाना पटोले, प्रसिध्दी व प्रकाशन समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर महाजन, प्रसार माध्यम व जनसंवाद समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री राजेंद्र दर्डा, निवडणूक व्यवस्थापन चमूच्या अध्यक्षपदी आ. शरद रणपिसे, जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

धोरण समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात तर सहअध्यक्षपदी अशोकराव चव्हाण तर समन्वयक म्हणून हर्षवर्धन पाटील, प्रसार माध्यम व जनसंवाद समितीवर डॉ. सुधीर ढोणे, प्रचार समितीवर माजी आ.लक्ष्मणराव तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय या समित्यांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. राजीव सातव, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, मिलींद देवरा, संजय निरूपम, प्रिया दत्त, चित्रपट अभिनेत्री नगमा मोरारजी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी कुलगुरू खा. भालचंद्र मुणगेकर यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com