वाशीम विधानसभा मतदार संघात भाजपला भारिप-बमसंचे तगडे अाव्हान

गेल्या वीस वर्षांपासून वाशीम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनलेल्या वाशीम विधानसभा मतदार संघाच्या गडाला खिंडार पाडण्याची रणनिती भारिप बहुजन महासंघाने आखली अाहे. या मतदारसंघात परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस ऐवजी अागामी निवडणुकीत भाजपला भारिप बहुजन महासंघासोबत लढत द्यावी लागणार असल्याची परिस्थिती सध्यातरी पहावयास मिळत आहे.
वाशीम विधानसभा मतदार संघात भाजपला भारिप-बमसंचे तगडे अाव्हान

वाशीम : गेल्या वीस वर्षांपासून वाशीम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनलेल्या वाशीम विधानसभा मतदार संघाच्या गडाला खिंडार पाडण्याची रणनिती भारिप बहुजन महासंघाने आखली अाहे. या मतदारसंघात परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस ऐवजी अागामी निवडणुकीत भाजपला भारिप बहुजन महासंघासोबत लढत द्यावी लागणार असल्याची परिस्थिती सध्यातरी पहावयास मिळत आहे.

अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या वाशीम विधानसभा मतदार संघावर गेल्या वीस वर्षापासून अामदार लखन मलिक यांच्या रूपाने भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गत अनेक निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस असा सरळ सामना होत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील राजकारणात भारिप बहुजन महासंघाने जोरदार मुसंडी मारली आहे. मंगरूळपीर, मानोरा, कारंजा नगरपालिका ताब्यात घेतल्या तर वाशीम पालिकेत अवघ्या 47 मताने भारिप पराभूत झाली होती. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारिप बहुजन महासंघ वाशीम विधानसभा मतदार संघात लक्षवेधी ठरला आहे.
 
हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भारिपने गेल्या एक वर्षापासून फिल्डींग लावणे सुरू केले आहे. भारिप-बमसंकडून डाॅ. नरेश इंगळे यांच्या नावाची चर्चा आहे. सर्वसामान्य जनतेशी जुळलेली नाळ अाणि एक उच्चशिक्षित उमेदवार ह्या डॉ. नरेश इंगळे यांच्या जमेच्या बाजु असून त्यांच्या रुपाने भारिप एक तगडा उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘सोशल इंजिनिअरींग’ मध्ये भारिप-बमसंकडे सध्या मुस्लिम व दलित मतांच्या गोळाबेरजेचे पत्ते सकारात्मक परिणाम घडविण्यास तयार आहेत. त्यामूळे अागामी विधानसभा निवडणुकीत भाजपला भारिप बहुजन महासंघाच्या कडव्या अाव्हानांचा सामना करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com