मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अामदार डॉ. संजय कुटेंची मंत्रीमंडळात वर्णी लागेल काय? 

वैदर्भीय भाजप नेत्यांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले युवा नेते आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्ताराने पुन्हा चर्चेत अाले अाहे. राज्यात भाजप सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर दाेन वेळा झालेल्या विस्तारात अामदार कुटेंची संधी हुकली हाेती. मात्र, या सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. कुटेंचा समावेश हाेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे.
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अामदार डॉ. संजय कुटेंची मंत्रीमंडळात वर्णी लागेल काय? 

बुलडाणा : वैदर्भीय भाजप नेत्यांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले युवा नेते आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्ताराने पुन्हा चर्चेत अाले अाहे. राज्यात भाजप सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर दाेन वेळा झालेल्या विस्तारात अामदार कुटेंची संधी हुकली हाेती. मात्र, या सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. कुटेंचा समावेश हाेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. 

राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे, विरोधकांचा वाढलेला जोर, मंत्र्यांवर वाढते भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेची उघडपणे असलेल्या नाराजीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा जाेर धरला अाहे. या विस्तारात काही प्रमुख मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. रिक्त झालेल्या मंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पाेहचली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात बुलडाणा जिल्ह्यातून आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली अाहे. आमदार संजय कुटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममधील जुने खेळाडू असून, त्यांना मंत्रिपद देऊन राहिलेल्या वर्षांत दमदार कामगिरी करण्याची रणनिती आखण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

मात्र, अागामी निवडणुकांना एकच वर्ष राहिले असल्याने मंत्रीमंडळ विस्तारात माेठे फेरबदल हाेण्याची शक्यता अाहे. वऱ्हाडात युवा आणि कर्तव्यदक्ष अामदार म्हणून अामदार डॉ. संजय कुटे यांची जनमाणसात अाेळख अाहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. कुटे हे जुने सहकारी असून अामदारकीचा अनुभव अाणि जनमाणसात असलेली प्रतिमा त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने मंत्री पदासाठी त्यांची दावेदारी प्रबळ समजली जात अाहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गत काही महिन्यात अामदार कुटेंच्या मतदारसंघात चार वेळा भेट देऊन जळगाव जामोद नगरपालिका राज्यात 'रोल मॉडेल' असल्याचा गौरव केला अाहे. या विस्तारात अामदार कुटे यांची वर्णी लागल्यास खारपाणपट्ट्यासोबत केलेला संघर्ष आणि प्रत्यक्ष कार्यान्वित होत असलेली 140 गाव पाणीपुरवठा योजनेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा जनसामान्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com