भाजपा सोबत युतीसाठी आम्ही तयार, मात्र सन्मान हवा - विनायक मेटे

शिवसंग्रामवर आता पर्यंत झालेला अन्याय दूर करून सन्मानाने भाजपसर्वांना सोबत घेईल असा विश्वास मला आहे. त्यामुळे शिवसंग्राम हा कदाचित भाजप सोबतच राहील - विनायक मेटे
Devendra Phadanavis Vinayak Mete
Devendra Phadanavis Vinayak Mete

शेगाव (बुलडाणा) : येत्या निवडणुकीत आमची भाजपबरोबर राहण्याची तयारी आहे. मात्र, शिवसंग्रामवर झालेला अन्याय दूर करुन भाजपने सन्मान द्यायला हवा, अशी अपेक्षा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी येथे व्यक्त केले. 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव मेटे हे सध्या राज्य दौऱ्यावर असून पक्षाची नव्याने बांधणी ते करीत आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

येत्या निवडणुकांमध्ये आपण भाजपासोबत युती कराल का? असा प्रश्न विचारला असता  शिवसंग्रामवर आता पर्यंत झालेला अन्याय दूर करून सन्मानाने भाजप सर्वांना सोबत घेईल असा विश्वास मला आहे. त्यामुळे शिवसंग्राम हा कदाचित भाजप सोबतच राहील असे सूतोवाच मेटे यांनी या वेळी केले. बुलडाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांच्या शहरासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. मात्र, दुर्दैवाने त्याचे भूमिपूजन आज पर्यंत झाले नाही, ही बाब राज्यशासनासनाला कमीपण आणणारी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या कारभारावर आपण समाधानी आहात का असा प्रश्न विचारले असता मेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करीत शासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला अजय बिल्लारी, पंजाबराव देशमुख, सौ.वंदना निकम आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com