निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील नाराजांना गोंजारण्याचा प्रयत्न

केंद्र व राज्यात सोबत राहूनही कायम एकमेकांची उणीदुनी काढणाऱ्या शिवसेना-भाजपने निवडणुकीच्या तोंडावर गळाभेट घेतली आहे. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला तरी चार वर्षांत मने कलुषित झाल्याने तळागाळातील शिवसैनिकांच्या गळ्याखाली हा युतीचा घास उतरविने शहज शक्य नाही याची जाणिव असलेल्या भाजपच्या नेत्यांनी अखेर शिवसेनेतील नाराजांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध महामंडळांवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील नाराजांना गोंजारण्याचा प्रयत्न

अकोला : केंद्र व राज्यात सोबत राहूनही कायम एकमेकांची उणीदुनी काढणाऱ्या शिवसेना-भाजपने निवडणुकीच्या तोंडावर गळाभेट घेतली आहे. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला तरी चार वर्षांत मने कलुषित झाल्याने तळागाळातील शिवसैनिकांच्या गळ्याखाली हा युतीचा घास उतरविने शहज शक्य नाही याची जाणिव असलेल्या भाजपच्या नेत्यांनी अखेर शिवसेनेतील नाराजांना गोंजारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध महामंडळांवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील विविध वित्त आणि विकास महामंडळांवर सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनातर्फे ८ मार्चपूर्वी काढण्यात आले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या नियुक्त्या करून शिवसेना आणि भाजपसह मित्र पक्षातील नाराज नेत्यांना गोंजारण्याचा प्रयत्न झाला. अकोल्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळे यांची नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्याच प्रयत्न झाला. गवळे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. यावेळीही त्यांना प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या माध्यमातून एलआरटी कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्रीप्रभू चापके यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने महादेव गवळे यांना शिवसेनेत असुरक्षित वाटत होते. शिवसेना संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत आणि जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यासाठी महादेव गवळे यांची नाराजी परवडणारी नव्हती. त्यामुळे गवळे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर नियुक्ती देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या संपर्कातील सेनेचे डॉक्टर महामंडळावर
अकोल्या प्रमाणेच वाशीममधून शिवसेनेच्या डॉक्टर सेलेचे काम पाहणारे मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द येथील डॉ. श्‍याम वि. जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर नियुक्ती देण्यात आली आहे. जाधव हे शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसशी संपर्क वाढविला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून त्यांना महामंडळावर नियुक्ती देण्यात आली.

बुलडाण्यात सेनेचे दोन्ही गट 'खुश'  
माजी आमदार विजयराज शिंदे आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यात उभी फुट आहे. यातूनच शिंदे यांना जिल्ह्यात शिवसेनेमध्ये एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ते चांगलेच नाराज होते. त्यातच विजयराज शिंदे यांना पद दिल्यास खासदारांचा गट दुखावल्या जाणार होता. त्यामुळे दोन्ही गटांना खुश करण्याचा प्रयत्न करीत महामंडळावर नियुक्ती देण्यात आली. शिंदे यांना इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यासोबतच विद्यमान जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत आणि माजी जिल्हा प्रमुख धीरज रामभाऊ लिंगाडे यांना अमरावती म्हाडावर सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

सहा महिन्यांपासाठी नियुक्ती
राज्य शासनाचा कार्यकाळ अवघा सहा महिन्यांसाठी शिल्लक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या महामंडळावरील नियुक्तीचा लाभ पदाधिकाऱ्यांना केवळ सहा महिन्यांसाठीच मिळणार आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ते बघता सहा महिन्यांसाठी झालेली नियुक्ती केवळ नाराजांना गोंजारण्यासाठीच झाली असल्याचे स्पष्ट होते.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com