शेगाव (बुलडाणा) : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. सदर स्मारकाचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न असून पावसाळ्या नंतर हे काम सुरु झाले असल्याचे आपल्याला दिसेल असे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव मेटे हे सध्या राज्य दौऱ्यावर असून पक्षाची नव्याने बांधणी ते करीत आहेत. या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य शासनाच्या सध्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक करीत पावसाळ्यानंतर छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे काम सुरू होईल असा विश्वास दर्शविला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.