कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपसमाेर शिवसेनेचे अाव्हान

वऱ्हाडातील महत्वाची बाजारपेठ, कापसाचे कोठार व ऐतिहासिक संदर्भाने समृद्ध असलेल्या कारंजा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवणे यावेळी भाजपला जड जाणार असल्याचे चित्र असुन विद्यमान अामदार राजेंद्र पाटणी यांच्यासमाेर शिवसेनेचे माजी अामदार प्रकाश डहाके यांचे तगडे अाव्हान उभे ठाकले अाहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपसमाेर शिवसेनेचे अाव्हान

वाशीम : वऱ्हाडातील महत्वाची बाजारपेठ, कापसाचे कोठार व ऐतिहासिक संदर्भाने समृद्ध असलेल्या कारंजा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवणे यावेळी भाजपला जड जाणार असल्याचे चित्र असुन विद्यमान अामदार राजेंद्र पाटणी यांच्यासमाेर शिवसेनेचे माजी अामदार प्रकाश डहाके यांचे तगडे अाव्हान उभे ठाकले अाहे. 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघात केवळ एक अपवाद वगळता कायम मतदारसंघाबाहेरील उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख, बाबासाहेब धाबेकर अाणि तेव्हा शिवसेना असलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके हे मतदार संघाचे आमदार झाले होते. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर वाशीम येथील रहिवासी व ऐनवेळी शिवसेनेतून भाजपवासी झालेले राजेंद्र पाटणी विजयी झाले आहेत. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अामदार राजेंद्र पाटणी यांच्यासाठी हा मतदारसंघ आता सोपा राहीला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांनीही सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करीत कारंजा व मानोरा या दोन नगरपालिका ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे मतांच्या धृवीकरणात प्रकाश डहाके यांची मते अधिक शिवसेनेची मते यांचे गणित भाजपाच्या विजयाचे गणित बिघडविणारे ठरण्याची शक्यता आहे. 

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस एकदा विजयी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असला तरी यावेळी भारिप बहुजन महासंघासाेबत काँग्रेस-राष्ट्रवादीची अाघाडी झाली तर या मतदारसंघावर भारिप दावा करणार अाहे. तर काँग्रेसच्या कोट्यातून भारिपचेही आव्हान तगडे ठरणार आहे. गेल्या चार वर्षांत मतदार संघात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली. त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात भाजपला घाम गाळावाच लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com