वाशिम बाजार समितीच्या राजकारणाने भाजपात रंगले गृहयुद्ध

‘पार्टी विथ डिफरन्स’ हा नारा देत अाम्ही दुसऱ्या पक्षापेक्षा वेगळे अाहाेत, हे संपूर्ण देशाला सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षात सत्ता मिळाल्यानंतर या पक्षाचेही वेगाने काँग्रेसीकरण हाेत असल्याच्या घटना घडत अाहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीनंतर प्रशासकाच्या नेमणुकीवरून अामदार लखन मलिक विरुद्ध जिल्हाध्यक्ष अामदार राजेंद्र पाटणी यांच्या कार्यकर्त्यातच कलगीतुरा रंगला अाहे.
वाशिम बाजार समितीच्या राजकारणाने भाजपात रंगले गृहयुद्ध

वाशिम : ‘पार्टी विथ डिफरन्स’ हा नारा देत अाम्ही दुसऱ्या पक्षापेक्षा वेगळे अाहाेत, हे संपूर्ण देशाला सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षात सत्ता मिळाल्यानंतर या पक्षाचेही वेगाने काँग्रेसीकरण हाेत असल्याच्या घटना घडत अाहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीनंतर प्रशासकाच्या नेमणुकीवरून अामदार लखन मलिक विरुद्ध जिल्हाध्यक्ष अामदार राजेंद्र पाटणी यांच्या कार्यकर्त्यातच कलगीतुरा रंगला अाहे. 

कधीकाळी अामदार लखन मलिक यांच्यासाेबत राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अामदार लखन मलिक यांनी सुचविलेल्या प्रशासक मंडळाला अाक्षेप घेतला हाेता. प्रशासक पदासाठी ज्या नावांची शिफारस अामदार लखन मलिक यांनी केली हाेती ते कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसंग्राम पक्षात हाेते, हा स्पष्ट उल्लेख अामदार राजेंद्र पाटणी यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात अाला हाेता. अामदार मलीक यांनी निवड केलेल्या प्रशासक मंडळातील बंडू पाटील महाल्ले, चरण गाेटे, रितेश मलीक, निलेश जयस्वाल, अानंद मालपाणी या नावांना पक्षनिष्ठेच्या नावाखाली विराेध केला गेला. 

या नावांची राजकीय पार्श्वभूमी वेगळी जरी असली, तरी सध्या ते भाजपचे पदाधिकारी अाहेत. मात्र, जिल्हाध्यक्ष अामदार पाटणी यांच्याकडे जे निवेदन पाठविले व पक्षनिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला गेला ते कार्यकर्ते अामदार पाटणींची राजकीय पार्श्वभूमी विसरल्याचे दिसते. अामदार पाटणी हेही पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे अामदार हाेते. भाजपच्याच दाेन अामदारांमध्ये बाजार समितीच्या राजकारणावरून कलगीतुरा रंगल्या नंतर तसेच याबाबत मुंबईत तीन याद्या गेल्यानंतर अामदार मलीक यांनी पाठविलेली यादी बाद हाेईल? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली हाेती. 

मात्र, अामदार मलिक यांनी मुंबई दरबारात अापली पक्षनिष्ठा व वजन इतरांपेक्षा माेठे असल्याचे दाखवून दिले. परिणामी साेमवारी सायंकाळी अामदार मलीक यांनी शिफारस केलेल्या बंडू पाटील महाल्ले यांनी मुख्य प्रशासक तर चरण गाेटे, रितेश मलीक, निलेश जयस्वाल, अानंद मालपाणी यांनी बाजार समितीच्या प्रशासक पदाची सुत्रे हाती घेतली. विधानसभा निवडणुका ताेंडावर अाल्या असताना भाजपमध्ये उफाडून अालेले हे अंतर्गत राजकारण अागामी काळात काेणत्या वळणावर जाईल, हे पाहणे अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com