rawte gavli rathod copy
rawte gavli rathod copy

शिवसेनेत फितूरांच्या खांद्यावरून निष्ठावंतांची वरात ;अर्थात खासदार भावना गवळी विरूद्ध पालकमंत्री राठोड  !

शिवसैनिकच निष्ठावंतशिवसेनेच्या राजकारणात शिवसेनेचा भगवा रुमाल खांद्यावर घेऊन सत्ता नव्हती तेव्हाही एकाकी लढत होती. शिवसैनिक नावाच्या रसायनाची निष्ठा तपासण्याचा अधिकार कोणाला आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो. कारण शिवसैनिक हा निष्ठावंतच असतो त्याला निष्ठा सिद्ध करण्याची अवश्यकता नसते, हा शिवसेनेच्या हा राजकारणाचा गाभा असताना कधी उघडपणे तर कधी सुप्तपणे शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेऊन प्रसंगी भाजपच्या ‘वॉररूम‘ मध्ये बसून शिवसेनेची हार ‘सेलिब्रेट' करणाऱ्यांना दिवाकर रावते यांनी का आवारले नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

वाशिम   : फितूरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते. त्यासाठी खांदा निष्ठावंत अन् शिकारीही जातीवंत असावा लागतो. ही म्हण राजकारणात नेहमी वापरली जात असली तरी राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेतील बंडखोरांना मात्र, याचा विसर पडला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने निघालेल्या शेतकरी मोर्चात शिवसेनेतील गृहकलह चव्हाट्यावर आला असला तरी चार वेळा खासदार राहिलेल्या पक्षाच्या नेत्याविरोधात शिकारीच्या मुहूर्ताला रसद कोठून मिळते, हा एकच प्रश्न  सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

शिवसेना तशी कडव्या विचारसरणीची संघटना म्हणून ओळखली जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेली शिवसेना त्यांनी मंत्रालयात नेवून बसविली. मात्र, शिवसेना प्रमूखांचा आदेश हा आदेशच राहला. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सुत्रे आल्यानंतरही शिवसेनेच्या राजकारणात व शिवसेनेच्या कार्यशैलीत फारसा फरक जाणवला नाही. पक्षाअंतर्गत कुरबुरी ‘‘मातोश्री च्या नावानेच शांत होत होत्या.

 वाशीम जिल्ह्यामध्ये मात्र, शिवसनेच्या राजकीय स्वभावाच्या विरूद्ध घटना गेल्या चार महिन्यापासून घडत आहेत. या पक्षांतर्गत वादाला खासदार भावना गवळी विरूद्ध पालकमंत्री संजय राठोड यांच्या वादाची किनार समोर केली जात असली तरी या दोन नेत्यांनी मात्र, उघडपणे एकमेकांच्या विरोधात कधीच वक्तव्य केले नाही.  पक्षांतर्गत वाद यवतमाळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या नियुक्तीवरून असल्याचे सांगितले जात असताना खुद्द मातोश्रीवर खासदार गवळी यांनी जिल्हा प्रमूखांच्या निवडीबाबत विश्वासात घेतले नाही, या वक्तव्याव्यतिरिक्त कोणतीही वक्तव्य केले नाही. 

मात्र, या दोन नेत्यांची नावे घेऊन वाशीम जिल्ह्याम‘ध्ये शिवसेने‘मध्ये दोन गट सक्रीय झाले आहेत. एकमेकांना निष्ठावंत असल्याचा दाखला देत आता एकाच मोर्चात दोन गट येथपर्यंत पक्षाची बेबंदशाही उजागर झाली आहे. या मोर्चाच्या आधी शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमूख तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते जिल्ह्यात आले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर  त्यानी सर्वांनी एकोप्याने राहण्याच्या सुचना केल्या होत्या.

 याचा अर्थ शिवसेनेतील दुफळीची त्यांना कल्पना असताना शिवसैनिकांची निष्ठा तोलण्याचा कार्यक्रम त्यांनी का थांबविला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. सतत चार वेळा देशाच्या कायदेमंडळात शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेल्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात बंडाळी करण्यासाठी ही रसद मिळाली कोणाकडून हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिवसेनेतील ही बंडाळी भावी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातील ठरवून केलेली पेरणी असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये आहे.  

तर पक्षाचे पानिपत 
गेल्या पाच लोकसभा निवडणुकी‘ध्ये शिवसेनेचा उमेदवार इतर पक्षांच्या उमेदवारापेक्षा दुबळा असल्याची चर्चा प्रत्येक निवडणूकीत होत होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर मतदार संघात भगवा फडकत होता. ही मेहनत पक्षाच्या वाडीवस्तीवरील कार्यकर्त्यांची होती. शिवसेना या एका नावावर घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या झेंडा खांद्यावर घेणारी कार्यकर्त्याची फौज शिवसेनेकडे अजूनही तयार असताना शिवसेनेतील बंडखोर हे वरिष्ठ पातळीवरील एखाद्या नेत्याच्या इशा-यावरून तर बंडखोरीचे शस्त्र उपसत नाहीत ना ! अशी शंका शिवसेनेच्या गोटातूनच व्यक्त केली जात आहे. स्वकिय व परकिय इशा-यावरून चालणारे राजकारण शिवसेनेत डोईजड झाले तर पक्षाचे पानिपत होण्यास वेळ लागणार नाही, अशा उद्विग्न प्रतिक्रिया कट्टर शिवसैनिकां‘धून व्यक्त होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com