खडसे -भुजबळांचे बदलेले ग्रहमान राज्यात ओबीसी फॅक्टरचे  महत्व वाढवणार ? 

धुळे: एकनाथ खडसे व छगन भुजबळ या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या दोघांचे ग्रहमान अवघ्या चार दिवसांमध्ये बदलले. खडसेंनाभ्रष्टाचाराच्या आरोपांमधून दिलासा मिळाला तर भुजबळांना जामीन मिळाला. या राजकीय घडामोडीमुळेउत्तर महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसी राजकारणालाचालना मिळणार आहे.
Khadse---Bhujbal
Khadse---Bhujbal

धुळे:  एकनाथ खडसे व छगन भुजबळ या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या दोघांचे ग्रहमान अवघ्या चार दिवसांमध्ये बदलले. खडसेंना  भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून दिलासा मिळाला तर भुजबळांना जामीन  मिळाला . या राजकीय घडामोडीमुळे  उत्तर महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसी राजकारणाला  चालना मिळणार आहे .

 भुजबळ-खडसे  अडचणीत असताना ज्यांचे नेतृत्व ओबीसी व्होट बँकेत अनायासे फुलू लागले होते , अशा अन्य नेत्यांपुढे नवी आव्हाने उभी राहतील. 

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना 1 मे rभोसरी भूखंड प्रकरणात 'एसीबी'कडून "क्‍लीन चिट' मिळाली, तर शुक्रवारी (ता. 4) महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. आता राजकीय पटलावर नव्या समीकरणांची मांडणी सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रच नव्हे, तर राज्यात खडसे, भुजबळ यांच्यामुळे "ओबीसी' राजकारणाला नव्याने चालना मिळू शकते . त्याचे राजकीय पडसाद देखील उमटू शकतात .  एकत्रीकरणाला सुरवात होऊ शकते.

खडसे व भुजबळ या दोघांवरही त्यांच्याच पक्षांकडून ठरवून अन्याय झाल्याचा सूर त्यांच्या समर्थकांमध्ये होता . त्यामुळे त्यांना आरोपातून बाहेर काढा, अशी मागणीही वारंवार सुरूच होती. नाही म्हटले तरी खडसे आतून भाजपवर, तर भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दुखावलेले आहेत. चाळीस वर्षांच्या वाटचालीत भाजपच्या जडणघडणीत मोठे योगदान देऊनही अन्याय झाल्याची भावना खडसे यांनी वेळोवेळी प्रकट केली.

राज्यात "ओबीसी'चा चेहरा व नेता म्हणून खडसे यांच्याकडे बघा आणि उत्तर महाराष्ट्रावरील सततचा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची संधी द्या, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. ती पूर्ण तर झालीच नाही उलट विविध आरोपांचे शुक्‍लकाष्ठ त्यांच्या पाठीमागे लागले. त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. अशीच स्थिती भुजबळ यांच्याबाबत झाली. 

खडसे व भुजबळ यांच्या संकट काळात संधी म्हणून भाजपकडे गेलेले 'ओबीसी'चे इतर नेते या दोन प्रभावशाली नेत्यांना आता दिलासा मिळाल्यामुळे एकत्र येऊ शकतात. तसे झाल्यास राजकारणाचे ध्रुवीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आपापल्या पक्षात अपेक्षित संधी मिळेल किंवा दिली जाणार नाही, हेही खडसे, भुजबळ जाणून आहेत.

त्यामुळे ते शांत तर बसणार नाहीत. परिणामी ते पुढे आपणास डोईजड ठरू शकतील या विचारातून "ओबीसीं'चे नेते म्हणवून घेणाऱ्या प्रस्थापितांना या दोन प्रभावशाली नेत्यांना गृहीत धरून नव्हे, तर सन्मानाने सोबत घ्यावे लागेल, असे चार दिवसांतील घडामोड दर्शविते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com