मोहिते-पाटलांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय 

मोहिते-पाटलांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय 

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची तिसरी पिढी आता राजकारणात सरसावली आहे. यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी देवश्री सत्यशिल मोहिते-पाटील या त्यांच्या नात सूनबाई विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या सभागृहांमध्ये मोहिते-पाटील परिवारातील सहा तरुण नेते आता कार्यरत झाले आहेत.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची तिसरी पिढी आता राजकारणात सरसावली आहे. यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी देवश्री सत्यशिल मोहिते-पाटील या त्यांच्या नात सूनबाई विजयी झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या सभागृहांमध्ये मोहिते-पाटील परिवारातील सहा तरुण नेते आता कार्यरत झाले आहेत. 

सहकारमहर्षींच्या नात स्वरुपराणी जयसिंह मोहिते-पाटील आणि नातसून शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील या जि.प. सदस्य आहेत. बोरगाव आणि अकलूज गटातून मोठ्या फरकाने त्यांनी निवडणुकीचे मैदान मारले आहे. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील या त्यांच्या नात सुनबाई पंचायत समितीच्या सभापती व नातू अर्जुनसिंह मोहिते-पाटील हे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते-पाटील हे सहकारमहर्षींचे नातू अकलूजच्या सरपंचपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत देवश्री या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. 

यंदा सहकारमहर्षींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याचवेळी त्यांच्या तिसऱ्या पिढीतील तरुणांची मोठी टीम राजकारणात सक्रिय झाली आहे. अकलूज, यशवंतनगर या दोन गावचे सरपंच, पंचायत समितीचे सदस्य व सभापती, जिल्हा परिषदेत दोन सदस्या असे या परिवारातील तब्बल अर्धा डझन नेते आता लोक प्रतिनिधी झाले आहेत. 
याशिवाय सहकारमहर्षींचे नातू रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील हे विधान परिषद व राज्यसभेचे सदस्य होते. धैर्यशिल राजसिंह मोहिते पाटील यांनी उपसरपंच, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षनेते या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूजचे सरपंचपद भूषविले आहे. 

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह सरकारमधील बहुतांश विभागांच्या कामाचा दांडगा अनुभव असलेले खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे या तरुण नेत्यांचा राजकारणातील आदर्श आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून आता मोहिते-पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीतील शिलेदार राजकीय क्षेत्रात पुढे येत आहेत. आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com