Zakir Naik : कट्टरपंथी झाकीर नाईकला भारतात आणणार? मोदी-इब्राहिम यांची भेट होताच मोठी घडामोड

Zakir Naik Extradition : मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर असताना वादग्रस्त कथिक इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकबाबत मोठी घडामोड झाली आहे.
Zakir Naik
Zakir NaikSarkarnama
Published on
Updated on

Zakir Naik Extradition PM Anwar Ibrahim : धर्मांविरोधात द्वेष पसरविणारा, वादग्रस्त कथिक इस्लामिक धर्मगुरू आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कट्टरपंथी झाकीर नाईक याला भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि इब्राहीम यांच्या भेटीनंतर ही मोठी घडामोड समोर आली. दहशतवादाविरोधात भारत घेत असलेल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन वाढल्याचे हे द्योतक आहे.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. एका कार्यक्रमात पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांना वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले, "नाईकविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध झाल्यास कारवाई केली जाईल. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत". याबाबतची कोणतीही कार्यवाही करताना दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. अशी आमची भावना असल्याचे अन्वर इब्राहिम यांनी म्हटले.

Zakir Naik
Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश?' ; भाजपचा चिमटा!

इब्राहिम अन्वर यांनी भारताने यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे हा मुद्दा उपस्थित केला. एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण दहशतवादाच्या प्रश्नावर बोलत असल्याचे म्हटले. झाकीर नाईकप्रकरणी भारत सरकारकडून जे पुरावे सादर करेल, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करू. दहशतवादाविरोधात दोन हात करण्यासाठी आम्ही भारताबरोबर मिळून काम करत आहोत, असेही इब्राहिन अन्वर यांनी म्हटले. 2017 मध्ये झाकीर नाईक भारतातून मलेशियाला पळून गेला होता. त्यावेळी मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान मबतीर मोहम्मद सरकार यांनी त्यांना सरकारी संरक्षण दिले होते. त्यानंतर मलेशियामध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिली होती.

Zakir Naik
Modi Government : मोदी सरकारची माघार; राहुल गांधींसह केंद्रीय मंत्र्यांच्याच विरोधानंतर घेतला मोठा निर्णय

झाकीर नाईकावर आरोप कोणते?

झाकीर नाईक याचा जन्म मुंबईतील आहे. 58 वर्षाचा असलेला झाकीर नाईक याने वैद्यकशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं आहे. वयाच्या 20 व्या वर्षापासूनच तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होता. पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) ही संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. 2021 मध्ये या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे वाढवण्यात आली. झाकरी याच्या संस्थेकडून भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका असल्याचा आरोप आहे. तशा कृतींना खतपाणी घातले जाते.

झाकीर नाईक हा कट्टरपंथी असून, तो धार्मिक द्वेष पसरवतो, असा आक्षेप आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. तसेच पुढे अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो दहशतवाद पथकाच्या रडारवर असतानाच तो मलेशियात पळून गेला. झाकीर नाईक याने धर्मप्रवचनासाठी पीस टीव्हीची 2006 मध्ये स्थापना केली. या टीव्हीवर भारतासह कॅनडा, बांगलादेश, ब्रिटनमध्ये बंदी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com