Agnipath Scheme : ३००० अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल : ३४१ महिलांचाही समावेश!

Agnipath Scheme : लष्करी भरतीचे सरासरी वय ३२ वर्षे होते आणि आता ते २५ वर्षांपर्यंत खाली आणण्याची शिफारस केली गेली होती.
Agnipath Scheme hari kumar
Agnipath Scheme hari kumarSarkarnama

दिल्ली : लष्करभरतीसीठीची केंद्र सरकारची महत्वाकांक्षी अग्निपथ (Agnipath Scheme) योजना बाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अग्निवीरांसाठी सैन्यदलाकडून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिली तुकडी आज शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी देशसेवेत सामील झाली. नौदलाचे प्रमुख अॅडमिरल हरी कुमार यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

कारगिल पुनरावलोकन समितीच्या अहवालात सशस्त्र दलातील सैनिकांची वयोमर्यादा कमी करण्याची गरज असल्याचे शिफारस नमूद केल्याचे सांगून एडमिरल हरी कुमार म्हणाले, की कारगील युध्द घडले तेव्हा लष्करी भरतीचे सरासरी वय ३२ वर्षे होते आणि आता ते २५ वर्षांपर्यंत खाली आणण्याची शिफारस केली गेली होती.

Agnipath Scheme hari kumar
Satara : शशिकांत शिंदे अॅक्शन मोडवर, आमदार महेश शिंदेना जशास तसे उत्तर देणार!

अग्निवीर योजनेसाठी पहिल्या तुकडीचा अहवाल समोर आले आहे. 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले आहेत. यात विशेष गोष्ट म्हणजे अग्निवीरांमध्ये 341 महिला अग्निवीरांचा देखील सहभाग आहे.२०२३ मध्येही अग्निवीर भरतीची प्रक्रिया अधिक वेगवानपणे राबविण्यात येणार. अधिकाधिक अग्निवीरांची भरती सैन्य दलाच्या तिन्ही शाखांमध्ये करण्यात येईल, असेही अॅडमिरल यांनी सांगिकले .

Agnipath Scheme hari kumar
Nitin Gadkari : सांस्कृतिक मंत्री नसूनही सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य करत आहेत नितीन गडकरी...

'भारताची नौदल क्रांती: उदयोन्मुख सागरी शक्ती' या विषयावर बोलताना ते म्हणाले की, पुढच्या वर्षापासून महिला अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्याचे सुतोवाच त्यांनी केले येईल. सर्व सैन्याच्या तीनही दलांतील भरती सर्वांसाठी असणार आहे. 'अग्निपथ' ही एक सैन्याची शानदार योजना आहे, "विस्तृत विचारमंथन" आणि "विस्तृत अभ्यास" केल्यानंतर याबाबतचा अंतिम अहवाल लष्कराने सादर केला होता. २०२० मध्ये अग्निवीर ही कल्पना समोर आली आणि ती प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली, असे ही अॅडमिरल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com