अखेर तामिळनाडूत भाजप आणि अद्रमुक यांच्यात युती...

अखेर तामिळनाडूत भाजप आणि अद्रमुक यांच्यात युती...

चेन्नई : दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्यामागे पक्षाचा कारभार चालवणाऱ्या ओ पनीरसेल्वम आणि इ के पलानीस्वामी या दोन नेत्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करणे पसंत केले आहे. केंद्रीय उर्जा मंत्री पियुष गोयल आणि ओ पनीरसेल्वम आणि इ के पलानीस्वामी या तिघांनी अधिकृतपणे आज या युतीची घोषणा केली. तामिळनाडूमधल्या या युतीत अन्य छोटे पक्षही सहभागी होणार आहेत. एस रामदास यांचा पीएमके हा पक्ष आणि अभिनेता विजयकांत याचा डीएमडीके आणि अन्य दोन छोटे पक्ष या आघाडीत सहभागी होणार आहेत. 

गोयल गेले दोन दिवस राज्यातील अद्रमुकच्या नेत्याबरोबर चर्चा करत होते. अखेर आज या युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना पियुष गोयल म्हणाले, दिवंगत नेत्या जयललिता यांच्या स्वप्नातले तामिळनाडू राज्य घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या निधनापूर्वी माझे त्यांच्याशी एकदा फोनवर बोलणे झाले होते. राज्यातील विविध उर्जाप्रकल्पाबद्दल त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. राज्याच्या प्रगतीची त्यांना नेहमी काळजी असे. ही युती जाहीर करताना मला विलक्षण आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com