Shivsena News : खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. मागील सुनावणी वेळी शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती.
शिंदे गटाने बाजू मांडताना शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. परंतु त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता.
तसेच अँड मनिंदर सिंह यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते, असे म्हणाले होते. आज त्यावर सिब्बल हे बाजू मांडणार आहेत.
या सुनावणीमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठाकरे गटाच्या वतीने मांडला जाऊ शकतो. शिवसेनेने उद्धव ठाकरे यांची निवड करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उद्धव ठाकरे यांची नेमनुक निवडणूक घेऊनच आणि आयोगाच्या निर्देशानुसारच झाली आहे. त्याची सर्व कागदपत्र ही आयोगात दाखल केलेली आहेत. त्याच बरोबर शिवसेनेतील संघटनात्मक निवड ही निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झालेली आहे. तसेच निवडणूक आयोगाची शिक्कामोर्तब असलेली कॉफी पुरावा म्हणून सादर करण्यात येणार, असल्याचे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले होते.
तसेच या सुनावणीवेळी आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. तो म्हणजे 2018 मध्ये जेव्हा शिवसेनेच्या कार्यकारीनीमध्ये उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाला तीव्र विरोध झाला होता. त्यामुळे त्यांची निवड ही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात नेतेपदी केली होती. हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, कारण शिंदे यांना राष्ट्रीय कार्यकारीनीचा विरोध होता, हे आयोगासमोर मांडेल जाऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितेल आहे.
तसेच आपण इतर राजकीय पक्षांच्या घटना बघितल्या तरी त्या व्यक्ती केंद्रीतच असतात. त्यामुळे शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद हा कायद्याच्या कसोटीवर टीकणारा नाही, असे अॅड, असिम सरोदे यांनीही स्पष्ट केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची निवड बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे, त्या विरोधात आज कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.
आज काय होणार?
ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करतील.
ठाकरे गटाचे वकील अँड कपिल सिब्बल शिंदे गटाचे वकील अँड महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढतील.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद उद्याच जर पूर्ण झाला तर रात्री उशिरा निवडणूक आयोग आपला निर्णय देइल. अन्यथा सुनावणीची पुढील तारीख देईल.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16 आमदार
13 विधानपरिषद
05 लोकसभा खासदार
03 राज्यसभा खासदार
182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
प्राथमिक सदस्य 20 लाख
एकूण कागदपत्र 23 लाख 182
बाळासाहेबांची शिवसेना
खासदार 13
आमदार 40
संघटनात्मक प्रतिनिधी 711
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046
प्राथमिक सदस्य 4,48,318
शिवसेना राज्यप्रमुख 11
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.