Bharat Jodo Yatra : वरूण गांधींना काँग्रेसमध्ये घेणार का? काय म्हणाले राहुल गांधी..

Varun Gandhi : 'भडकवणारे नाही तर लोककल्याणकारी राजकारण असले पाहिजे,' वरूण गांधींची आपल्याच सरकारवर टीका!
Bharat Jodo Yatra : Varun Gandhi : Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra : Varun Gandhi : Rahul Gandhi Sarkarnama

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता पंजाब राज्यात होशियारपूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद केला. प्रश्नोत्तरे दरम्यान राहुल गांधी यांना भाजपचे खासदार वरुण गांधींबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राहुल गांधी म्हणाले, "मी वरूण यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण माझी विचारधारा त्यांच्या विचारधारेशी जुळत नाही."

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "वरुण गांधी हे भाजप पक्षात आहेत. ते जर इथे यात्रेत चालायला आले तर अडचणी निर्णाण होतील. पण माझी एक विचारधारा आहे. माझी आणि त्यांची विचारधारा जुळत नाही. माझी विचारधारा अशा पद्धतीची आहे की, मी संघाच्या कार्यालयात कधीही जाऊ शकत नाही. पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझा गळा कापू शकता.

Bharat Jodo Yatra : Varun Gandhi : Rahul Gandhi
'Bharat Jodo' समारोपाला विरोधक जोडोचा प्रयोग; महाराष्ट्रातून ठाकरे-पवारांनाही पत्र, उपस्थित राहणार का?

हा विचारधारेचा लढा - राहुल गांधी

"माझे एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. वरूणची एक विशिष्ट विचारधारा आहे. त्यांनी त्यांची विचारधारा मागे कधीतरी स्विकारली आहे, कदाचित ते आजही असेल. मात्र मी अशी विचारधारा कधीच स्वीकारू शकणार नाही. मी त्यांना आजही प्रेमाने भेटू शकतो, त्यांना सहज मिठी मारू शकतो, पण त्यांची असलेली विचारधारा मी कधीही स्वीकारू शकणार नाही. ही विचारधारेची लढाई आहे.

Bharat Jodo Yatra : Varun Gandhi : Rahul Gandhi
Varun Gandhi : भाजपशी टोकाचे मतभेद : वरूण गांधी - राहुल गांधी एकत्र येणार?

काँग्रेससोबत हातमिळवणी करु पाहतायेत का वरुण गांधी?

भाजपचे खासदार वरुण गांधी हे जाहीरपणे आपल्याच पक्षावर टीका करताना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत वरूण यांच्या पक्षविपरित वक्तव्यावरून अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसमध्ये ते प्रवेश करू शकतात का ? या शक्यतेचीही चर्चा होताना दिसून येत आहे.

मागील 2 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी काही मासिकांमध्ये लेख लिहून ज्या प्रकारची वेगळी भूमिका घेत आहेत किंवा सातत्याने समाज माध्यमांवर च्या प्रकारे स्वत:च्याच सरकारवर ताशेरे ओढत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jodo Yatra : Varun Gandhi : Rahul Gandhi
Chitra Wagh Vs Urfi Javed : राजकारण तापलं! उर्फीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश

मी नेहरू आणि काँग्रेसच्या विरोधात नाही - वरुण गांधी

वरुण गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाषण केले होते. त्यात ते म्हणाले की, "ना मी नेहरूंच्या विरोधात आहे, ना काँग्रेसच्या विरोधात. आपलं राजकारण हे देशाला नेहमी पुढे नेणारे असायला हवं. आपल्याच घरात युद्ध करण्याचे नाही. आज जे केवळ धर्म आणि जातीच्या आधारावर मते मागली जात आहेत. अशांना रोजगार, शिक्षण, औषध यांची काय अवस्था आहे, हे ही विचारायलाच हवे.

वरुण गांधी म्हणाले होते की, जनतेला दडपून टाकणारे राजकारण करायचे नाही, तर लोक कल्याणकारी राजकारण असायला हवे. करायचे आहे. धर्म आणि जातीच्या नावावर मते घेणार्‍यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा गंभीर प्रश्नांवर ते काय करत आहेत, हे विचारायला हवे. जनतेला भडकावणारे राजकारण करू नये, असे वरूण गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com