मोठी बातमी! उद्यापासून शाळा, महाविद्यालये, सलून, ब्युटी पार्लर बंद

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत
Covid 19 

Covid 19 

कोलकता : कोरोनाची (Covid 19) वाढती प्रकरणे पाहता पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता सरकारने रविवारी नवीन निर्बंध जाहीर केले. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभुमीवर विविध राज्यांची सरकारे कठोर निर्बंध लादत आहेत. कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर हरियाणा पाठोपाठ पश्चिम बंगाल सरकारने अंशत निर्बंध लागू केले आहेत.

पश्चिम बंगालमध्येही (west bengal) कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. याबाबत राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “संक्रमणाचे प्रमाण जास्त असले, तरी 80 टक्के संक्रमित रुग्ण लक्षणे नसलेले आणि 17 टक्के लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरी उपचार केले जात आहेत. केवळ 3 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाणही खूप कमी आहे. रेल्वे, बस किंवा मेट्रो सेवा तत्काळ बंद होणार नाही, मात्र आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने निर्बंध लादले जातील.

<div class="paragraphs"><p>Covid 19&nbsp;</p></div>
नवाब मलिकांचा एनसीबी अधिकाऱ्यांवर आरोप, त्या ऑडियो क्लिप केल्या शेअर

नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणारा 'विद्यार्थी सप्ताह' कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात विविध जिल्ह्यांमध्ये होणारे 'दुआरे सरकार' आणि 'दुआरे रेशन'चे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहेत. सरकार सध्या कोणतेही लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादणार नाही, परंतु गर्दी रोखण्यासाठी कठोर पावले उचचली जात आहेत.

बंगालमध्ये उद्यापासून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, प्राणीसंग्रहालय आणि मनोरंजन पार्क बंद राहणार आहेत. तर राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये 50% क्षमतेने काम करतील. सर्व प्रशासकीय बैठका आभासी पद्धतीने घेतल्या जातील. मुंबई आणि दिल्ली येथून आठवड्यातून फक्त दोन दिवस (सोमवार आणि शुक्रवार) उड्डाणे चालतील, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव एच के द्विवेदी यांनी माहिती दिली आहे.

लोकल ट्रेन 50 टक्के क्षमतेने धावणार असून ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत धावणार आहे. मेट्रोही ५० टक्के क्षमतेने धावणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत लोक आणि वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल. मात्र केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना परवानगी असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com