भाजपचा अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट- आपचा आरोप

AAP| Arvind Kejariwal| BJP| केजरीवाल यांच्या हत्येचा कट पुर्वनियोजित असल्याचा आरोप मनिष सिसोदिया यांनी केला आहे.
Arvind Kejariwal house, Arvind Kejariwal News, AAP Vs BJP
Arvind Kejariwal house, Arvind Kejariwal News, AAP Vs BJP

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या भाषणावरुन राजकारण तापले आहे. आज दुपारी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्या घरासमोरील बॅरिकेट्स तोडून टाकले. याचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. (Arvind Kejariwal Latest News)

दरम्यान, पंजाबमध्ये आपचा विजय आणि भाजपचा पराभव यामुळे भाजपला अरविंद केजरीवाल यांची हत्या करायची आहे. भाजपच्या गुंडांना पोलिसांनी मुद्दाम मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थासमोर जाऊ दिले, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर आंदोलन कर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅरिकेट्सही तोडल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

Arvind Kejariwal house, Arvind Kejariwal News, AAP Vs BJP
लॉकडाऊनमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय का? मग ही बातमी वाचाच

भाजप अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाही म्हणून ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची घटना ही मुख्यमंत्र्यांच्या हत्येसाठी भाजपची पूर्वनियोजित योजना असल्याचा धक्कादायक आरोपही मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाच्या सुमारे 150-200 कार्यकर्त्यांनी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली. द काश्मीर फाइल्स चित्रपटाबाबत विधानसभेत केजरीवाल यांच्या विधानाविरोधात हे निदर्शने ठेवण्यात आले होते. 1 वाजण्याच्या सुमारास काही आंदोलक बॅरिकेड तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून 70 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर,भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आज भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करत होते. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची खिल्ली उडवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या निदर्शनानंतर तोडफोडीची घटना उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com