पवारांनी संजय राऊतांकडे माईक देताच भाजप आमदारांचा स्नेह भोजनातून काढता पाय

Sanjay Raut | Sharad Pawar | BJP | NCP : भाजपच्या आमदारांनी राऊतांचे भाषणावेळी कानावर हात ठेवणे देखील पसंत केले नाही.
Sanjay Raut | Sharad Pawar
Sanjay Raut | Sharad PawarTwitter

दिल्ली : दिल्लीत (Delhi) प्रशिक्षणासाठी गेलेल्या सर्वपक्षीय आमदारांसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे (Shivsena) बहुतांश आमदार उपस्थित होते. भाजपचे देखील १५ ते १६ आमदार उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देखील उपस्थिती लावली होती. मात्र यावेळी शिवसेना नेते संजय राऊत बोलायला लागताच भाजपच्या या सर्व आमदारांनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.

यास कारण ठरले कालच संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई. ईडीने राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. उपस्थितांशी संवाद साधताना पवारांनी ईडीच्या या कारवाईचा उल्लेख केला. आज राऊतांकडे ईडीचे पाहुणे येऊन गेले, असे पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी माईक राऊतांकडे दिला.

Sanjay Raut | Sharad Pawar
सोमय्यांनी केलेला घोटाळा बोफोर्सपेक्षाही गंभीर; हा आजवरचा सर्वात मोठा गुन्हा

मात्र पवार यांनी संजय राऊत यांच्या हातात माईक सोपवताच भाजपच्या सर्व आमदारांनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले. तिथून निघालेले भाजपचे हे सर्व आमदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी पोहोचले. भाजपच्या या आमदारांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सुनिल शेळके हे देखील पोहचले. या सर्व आमदारांचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com