भाजपशासित राज्यांची तत्परता; पेट्रोल १२ आणि डिझेल १७ रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने कर कमी करताना राज्यांनीही आपला कर कमी करावा असे आवाहन केले होते.
BJP
BJPsarkarnama

नवी दिल्ली : काल केंद्र सरकारने देशवासियांना दिवाळीचे गिफ्ट देत महागाईने त्रस्त असलेल्या देशवासीयांना काहीसा दिलासा दिला आहे. सरकारने (Central Government) काल पेट्रोलवरील (Petrol) उत्पादन शुल्क (Excise duty) प्रतिलिटर ५ रुपये आणि डिझेलवरील (Diesel) उत्पादन शुल्क प्रतिलिटर १० रुपयांनी कमी करत वाढलेले इंधनाचे दर कमी केले आहेत. आजपासून देशभर हा निर्णय लागू झाला आहे. केंद्र सरकारने हा कर कमी करताना राज्यांनीही आपला कर कमी करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी तत्परता दाखवत व्हॅट कमी केल्याचे जाहीर केले आहे. यात उत्तर प्रदेश, कर्नाटक, गोवा, आसाम आणि त्रिपुरा, बिहारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली आहे.

अशा स्थितीत या राज्यांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर लक्षणीय कमी झाले आहेत. कर्नाटक, गोवा, आसाम आणि त्रिपुराने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये प्रत्येकी ७ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे या सर्व राज्यांमध्ये आता पेट्रोल १२ रुपयांनी तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोलवरील व्हॅट ७ रुपयांनी आणि डिझेलवर व्हॅट २ रुपयांनी कमी केला आहे, त्यानंतर इथे दोन्ही इंधन प्रति लीटर १२ रुपयांनी स्वस्त झाली आहेत. यासोबतच बिहारनेही पेट्रोलवरील व्हॅटमध्ये १.३० रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर १.९० रुपये प्रति लिटरची कपात केली आहे.

BJP
मोदी सरकारची कमाल : वर्षभरात पेट्रोल ३३ रु. वाढवले आणि आता ५ रु. कमी केले

हिमाचल प्रदेशने देखील या दोन्ही उत्पादनांवरील व्हॅट लवकरच कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे. मणिपूर सरकारनेही तत्काळ प्रभावाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७ रुपयांनी कमी केल्या आहेत. उत्तराखंड सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तात्काळ प्रभावाने ७ रुपयांनी कमी केल्या जातील, असे गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com