फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची वात भाजपनं दिल्लीतही पेटवली!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला. भाजप (BJP) नेत्यांना विविध गुन्ह्यांत अडकविण्यासाठी सरकारी वकील पी. पी. चव्हाण हे कसा कट रचत आहेत, याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी विधानसभेत केली. त्यावरून आता दिल्लीतील हालचालींनाही वेग आल्याचे दिसते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawlla) यांनी बुधवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या कारऩाम्यांमुळे या सरकारला महाविनाश आघाडी सरकारही म्हटलं जाते. भाजपच्या नेत्यांना अडकवण्यासाठी मोठं षडयंत्र रचल्याचे पुरावे 125 तासांच्या व्हीडिओमध्ये आहेत.

Devendra Fadnavis
वाघमारेंनी फाईल पाठवली अन् सकाळी बदली झाली! गोटेंनी फडणवीसांची दोन प्रकरणं काढली बाहेर

फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांविरूध्द षडयंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या षडयंत्रात आघाडीतील मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे दिसते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पूनावाला यांनी केली. फडणवीस यांनीही विधानसभेत सीबीआय मागणी केली आहे. आता हा मुद्दा भाजपने दिल्लीत नेल्याने महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सीबीआयमार्फत चौकशी न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. या प्रकरणात थेट पोलिसांचाच सहभाग असल्याने सरकार कोणामार्फत ही चौकशी करणार, असा सवाल करत फडणवीस यांनी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गुरूवारी विधानसभेत उत्तर देणार आहेत.

फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे -

सकल मराठा शिक्षण मंडळाच्या वादात भोईटे गटाच्या वतीने गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक यांनी पाटील गटाला किडनॅप केले, अशी खोटी केस केली. गिरीश महाजन यांना मोक्का लागला पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधकांची कत्तल कशी करायचे याचे षड्यंत्र आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण हे आहेत. कथा खूप मोठी आहे त्यामुळे 25 ते 30 वेब सिरीज होतील. मी जी कथा सांगत आहेत ती सत्य आहे. ज्याचे व्हिडीओ मी दिलेत. या सरकारी वकिलाचे कार्यालय आहे त्यामध्ये नियोजन केले जाते. गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील करतो. यात एक मंत्री देखील आहे. अनिल देशमुख असते तर फायदा झाला असता, असे या व्हिडिओमध्ये आहे. अजित पवार सपोर्ट करत नाही पण बडे साहब सब देखते है असे देखील व्हिडीओ आहेत.

या व्हिडीओ मधील काही संभाषण पुढीलप्रमाणे

तो (फिर्यादी) गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण?सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

प्रवीण पंडित चव्हाण हे कोण आहेत ?

हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे आदी प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. आता अलिकडेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्यातही विशेष सरकारी वकील हेच आहेत. या वकिलांचे कार्यालय आहे की, महाविकास आघाडी सरकारचा राजकीय कत्तलखाना अशी स्थिती असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com