कोरोनाच्या संसर्गाबाबत चीनने माहिती लपवून ठेवली : डोनाल्ड ट्रम्प 

मी याबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही बोललो. अमेरिकेत बाधितांची संख्या २६,५७४ झाली असून, मृतांची संख्याही ३५० च्या वर गेली आहे.
donal-trump-and-chine-presi.jpg
donal-trump-and-chine-presi.jpg

वॉशिंग्टन : कोरोनाच्या संसर्गाबाबत चीनने माहिती लपवून ठेवली, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. चीनने योग्य वेळी ही माहिती जगाला सांगितली असती, तर कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करता आली असती, असा दावा ट्रम्प यांनी केला.

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत गुप्तचरांनी आधीच माहिती दिल्याचा माध्यमांमधील दावा फेटाळून लावताना ट्रम्प म्हणाले की, संसर्गाचा उद्रेक होईपर्यंत आम्हाला याबाबत माहिती नव्हती. चीनमध्ये संसर्ग पसरला, त्याचा मोठा फटकाही बसला.

मात्र, त्यांनी ही माहिती दडवून ठेवली. त्यांनी आधीच सांगितली असती, तर उपाययोजना राबविता आल्या असत्या. मी याबाबत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही बोललो. अमेरिकेत बाधितांची संख्या २६,५७४ झाली असून, मृतांची संख्याही ३५० च्या वर गेली आहे.

त्यामुळे ट्रम्प यांनी ‘घरीच थांबा आणि जीव वाचवा’ असे आवाहन नागरिकांना केले आहे. 

औषध सापडल्याचा दावा 
पॅरिस : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना सहा दिवसांत बरे करणारे औषध सापडल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि  यांच्या संयोगाने तयार केलेले औषध हे कोरोनाचा संसर्ग बरे करण्यासाठी परिणामकारक आहे.

बाधितांवर उपचार करत असताना हायड्रॉक्सिक्लोरिन प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आले आहे. 

अनेक संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत असताना नियमित उपचारपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले. मात्र फ्रान्समधील संशोधक दीदियार राओल्ट यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत औषध सापडल्याचा दावा केला आहे.

कोरोनाग्रस्त झालेल्या रुग्णाला हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि  यांच्या संयोगाने तयार केलेले औषध दिल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या संशोधनातही वरील औषध उपचारांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले होते.

या औषधामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टाळता येतो आणि प्रतिकारशक्तीही वाढते, असा दावा करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com