सीतारामन यांच्यावर आधी टीका अन् आता चिदंबरम यांनी चूक केली कबूल

सीतारामन यांनी शनिवारी पेट्रोल व डिझेलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केल्याची घोषणा केली आहे.
Nirmala Sitharaman, P Chidambaram Latest Marathi News
Nirmala Sitharaman, P Chidambaram Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यांच्या सरकारने शनिवारी पेट्रोलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीकरण्यात आली आहे. त्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी त्यावर टीका केली होती. (Petrol Diesel price hike News)

पी. चिदंबरम यांनी उत्पादन शुल्क कपातीचा परिणाम राज्याच्या उत्पन्नावरही होणार आहे. एकट्या केंद्र सरकारवर त्याचा भार पडमार नाही, असं म्हटलं होतं. उत्पादन शुल्कात कपात होते तेव्हा एक रुपयापैकी 41 पैसे राज्यांचे असतात. केंद्र सरकार जेव्हा उपकरात कपात करेल तेव्हा खरी कपात असेल, अशी टीकाही त्यांनी केली होती. (P Chidambaram Latest Marathi News)

Nirmala Sitharaman, P Chidambaram Latest Marathi News
Breaking : अखेर ठाकरे सरकारनं करून दाखवलं! राज्यात पेट्रोल अन् डिझेलच्या दरात कपात

इंधन कपातीचे नोटीफिकेशन आल्यानंतर त्यामध्ये उपकरातच कपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण बोजा केंद्रावरच पडणार आहे. त्यानंतर चिदंबरम यांनी आपली चूक कबूल केली आहे. सीतारामन या उत्पादन शुल्क म्हटल्याने आपण तसा दावा केल्याचे चिदंबरम म्हणाले आहेत.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दरकपातीची घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com