'झुकेंगे नहीं': काँग्रेसचा 'पुष्पा'अंदाज, सोनिया, राहुल यांना EDच्या नोटीशीनंतर मोदींवर टीका

सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटिस पाठवून मोदी हे सूडाचं राजकारण करीत आहेत,"असे सुरजेवाला यांना माध्यमांना सांगितले.
sonia gandhi, rahul gandhi
sonia gandhi, rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना ईडीकडून (ED) नोटीसा पाठवल्या जात असताना आता ईडीच्या रडारवर दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठी असल्याचे चित्र आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald case) प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. (National Herald case news update)

"पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करीत आहेत. नॅशनल हेराल्ड हा एक पेपर आहे. त्या प्रकरणी नोटीस पाठवून काय होणार आहे? असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी टि्वट करीत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

sonia gandhi, rahul gandhi
MNS : वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट ; चर्चांना उधाण

"डरेंगे नहीं, झुकेंगे नहीं, सीना ठोकके लडेंगे," असं म्हणत रणदीप सूरजेवाला हे आक्रमक झाले आहेत. "नॅशनल हेराल्ड हे 1942 मध्ये सुरु झालेले आहे. त्यावेळी इंग्रज सरकारनं त्यांचा आवाज बंद करण्याची प्रयत्न केला, आज मोदी सराकार पण तेच करीत आहे. त्यासाठी ईडीचा वापर करीत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटिस पाठवून मोदी हे सूडाचं राजकारण करीत आहेत,"असे सुरजेवाला यांना माध्यमांना सांगितले.

sonia gandhi, rahul gandhi
आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, कर्तबगारी दाखवा ; फडणवीसांचा टोमणा

काँग्रेसने (Congress) हे सूडाचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) आणि रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala ) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नसल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ED च्या समन्सनंतर बजावल्यावनंतर ते स्वतः चौकशीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, राहुल गांधी हे सध्या विदेशी दौऱ्यावर आहेत. ते जर विदेशी दौऱ्यावरून आठ जूनपर्यंत भारतात परतले तर तेही चौकशीला सामोरे जाणार आहेत. परंतु, त्यांना परतण्यास वेळ लागणार असल्यास ईडीकडे अधिकचा वेळ मागणार आहे," या दोघांनाही ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने सांगितलं आहे.

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण

  1. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोप केला होता.

  2. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते.

  3. २००८ मध्ये एजेएलची सगळी प्रकाशनं बंद केली. या कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं.

  4. काँग्रेसने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक कंपनी स्थापन केली.

  5. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोडा हे कंपनीत संचालक होते.

  6. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे या कंपनीचे ७६ टक्के शेअर्स होते.

  7. काँग्रेस पक्षाने या कंपनीला ९० कोटींचं कर्जही दिलं होतं. या कंपनीने एजेएलचं अधिग्रहण केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com