काँग्रेसच्या निलंबित माजी प्रदेशाध्यक्षांसाठी भाजपच्या पायघड्या; २ तासांमध्ये दिला प्रवेश

Uttarakhand assembly election : पक्षविरोधी काम भोवले...
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

डेहराडून - उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आज काँग्रेसने आपल्या एका बड्या शिलेदाराला पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. काँग्रेसने (Congress) राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय (Kishor Upadhyay) यांची हकालपट्टी केली आहे. प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव (Devendra Yadav) यांनी किशोर उपाध्याय यांना सर्व पदावरून हटवण्यात आल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसमधील हकालपट्टीच्या २ तासांमध्येच उपाध्याय यांच्यासाठी भाजपने (BJP) पायघड्या घालत पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच या निवडणुकीत त्यांना तिकीट देखील मिळण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना किशोर उपाध्याय म्हणाले, मी उत्तराखंडला विकासाच्या मार्गावर घेवून जाण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. तुम्ही काँग्रेसला विचारा त्यांच्यापुढे अशी परिस्थिती का उभी राहिली. काँग्रेसमधून हकालपट्टी होताच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान उपाध्याय यांनी निवडणूकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केल्याने एकप्रकारे भाजपला बड्या नेत्याची लॉटरीच लागली आहे.

BJP and Congress
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी; भाजपला लॉटरी लागण्याची शक्यता

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव (Devendra Yadav) यांनी किशोर उपाध्याय यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षविरोधी काम केल्याने किशोर उपाध्याय यांना काँग्रेसने (Congress) पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकले आहे. उपाध्याय यांना यापुर्वीच पक्षाच्या सर्व पदावरून हटवण्यात आले होते. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी करुन माहिती दिली होती.

BJP and Congress
Anil Awachat : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

या पत्रकात म्हटलं होतं की, उत्तराखंडचे लोक बदलासाठी उत्सुक आहेत आणि भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी वाट बघत आहेत. भाजपच्या नेतृत्वाबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राग आहे. या पत्रात असंही म्हटले आहे की, उत्तराखंडची देवभूमी आणि इथल्या लोकांची सेवा करण्याचे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com