Goa Asgaon Case : आसगाव प्रकरण गोवा डीजीपींना भोवणार? विरोधक आक्रमक; निलंबनासह सहआरोपी करण्याचा आग्रह

Asgaon Demolish case : पोलिस महासंचालकांचा सहभाग हे तर हिमनगाचे टोक आहे. भाजप ते महासंचालक या लिंकचा पण तपास व्हायला हवा. रिअल इस्टेट माफियांना भाजप संरक्षण देत आहे, असा आरोप गोव्याचे विरोधक करत आहेत.
Goa Asgaon Case
Goa Asgaon CaseSarkarnama
Published on
Updated on

Goa Political News : गेल्या चार दिवसांपासून गोव्यात गाजत असलेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. निलंबित करण्यात आलेल्या हणजूण पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांवर गंभीर आरोप केले आहेत.

आसगाव येथील घरावर कारवाईसाठी पोलिस महासंचालकांचा दबाव होता, असा खळबळजनक खुलासा पोलिसांनी मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालातून केला आहे. यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून डीजीपींच्या निलंबनासह त्यांना सहआरोपी करण्याचा आग्रहच विरोधकांनी केला आहे.

आसगाव प्रकरणात हणजूण पोलिस निरीक्षक प्रशल देसाई, उप-निरीक्षक नितीन नाईक आणि संकेत पोखरे यांना निलंबित करण्यात आले. मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालाच्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात प्रशल देसाई यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्यावर आसगाव येथील कारवाईसाठी पोलिस महासंचालकांचा दबाव होता, तसेच कारवाई थांबवली म्हणून त्यांनी आरडाओरड केली, असेही त्यांनी या अहवालात स्पष्ट केले.

कारवाई थांबवल्यानंतर डीजीपींना पणजीत बोलवून माझ्यावर खोट्या एनडीपीएस गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांनी अहवालात म्हटले आहे. यामुळे आता पोलिस महासंचालक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Goa Asgaon Case
Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

शर्माला नाहक अटक करू नका..

आसगाव घरफोडी प्रकरणातील पीडित आगरवाडेकर कुटुंबियांनी आपल्यावर दबाव असल्याचे सांगितले. दबावापोटीच आपण माघार घेतल्याचे त्यांनी सुतोवाच केले. यावेळी प्रींशा आगरवाडेकर यांना भावना अनावर झाल्याने त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांच्या वतीने वकिलाने बाजू मांडताना सांगितले की, घटनेशी थेट संबंध नसलेल्या पूजा शर्मा यांना विनाकारण अटक करू नये. सखोल चौकशी करूनच प्रकरणाच्या मुळाशी जाणे योग्य ठरेल.

कोण काय म्हणाले?

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना निलंबित करुन त्यांची या प्रकरणात सह-आरोपी म्हणून नोंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी केली. तसे न केल्यास केंद्रीय गृह खात्याला पत्र लिहणार असल्याचे कवठणकर म्हणाले.

गोव्याच्या पोलिस खात्यावरील विश्वास आता उडालेला असून, ते आता अधिकृत सुपारी घेणारे खाते झाले आहे‌, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

उत्पल पर्रीकर यांनीही जसपाल यांच्या ट्विटवर खडे बोल सुनावले आहेत. पोलिसांवरील उडालेला विश्वास पुन्हा येणार नाही, त्यासाठी प्रत्यक्षात कारवाई करावी लागेल, असे उत्पल म्हणाले.

पोलिस महासंचालकांचा सहभाग हे तर हिमनगाचे टोक आहे. भाजप ते महासंचालक या लिंकचा पण तपास व्हायला हवा. रिअल इस्टेट माफियांना भाजप संरक्षण देत आहे. मुख्यमंत्री मीडियाच्या प्रश्नांना का टाळतात? निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी गरजेची आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आग्रह धरला.

(Edited by Sunil Dhumal)

Goa Asgaon Case
Jayant Patil On Maharashtra Budget : जयंत पाटील यांनी एका वाक्यात बजेटची केली चिरफाड; म्हणाले, 'चादर लगी फटने...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com