Gujarat Election : गुजरात एक्झिट पोल 'आप'साठी चांगले संकेत? भाजपचं वाढू शकतं टेन्शन!

Sarkarnama : 1990 मध्ये जी स्थिती काँग्रेसची होती, तीच स्थिती 2022 मध्ये भाजपची आहे.
AAP Arvind Kejariwal
AAP Arvind KejariwalSarkarnama

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच पोलमध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र आम आदमी पक्षाचे आकडेही धक्कादायक आहेत. एक्झिट पोलप्रमाणेच निकाल लागल्यास राज्यात तिसऱ्या पर्यायाची मोठी खेळी निश्चित आहे. गुजरातमध्ये भाजपच्या उदयाचा काळ मानल्या जाणाऱ्या 1990 मध्ये झालेल्या निवडणुकांसारखीच परिस्थिती दिसते.

गुजरातची लढाई त्रिकोणी :

गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्येच लढाई असल्याचे दिसून येते. पण यावेळी 'आप'ची गुजरातेत उडी राजकीय समीकरण काही अंशी बदल्याण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्ली आणि पंजाब जिंकण्यात यश आले आहे. आता गुजरातमध्ये 'आप'ने काही जागा जिंकल्या तर ते भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यास तयार असतील. आणि हे अशा वेळी घडून येईल जेव्हा भाजप गुजरातमध्ये 'आप'चा उदय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

AAP Arvind Kejariwal
Eknath Khadse; सासरे खडसेंच्या विरोधात सुन रक्षा खडसे प्रचाराच्या मैदानात

1990 मध्ये काय झाले?

एक्झिट पोलचे आकडे निकालात दिसून आले, तर गुजरातमध्येही मोठे राजकीय बदल होण्याची चिन्हे आहेत. 1990 सारखी परिस्थिती असेल, जिथे काँग्रेस, भाजप आणि जनता दल यांच्यात लढत होती. या निवडणुकीने भाजपचा उदय झाल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी भाजपने 143 जागांवर निवडणूक लढवली आणि 67 जागा जिंकल्या. तर काँग्रेस 33 जागांवर घसरली. जनता दलाला 147 पैकी 70 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसचे दोन विक्रम अबाधित राहतील :

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, 2002 च्या गुजरातच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या 127 जागांचा स्वत:चा विक्रमभाजप मोडू शकतो. मात्र, यानंतरही काँग्रेसने 1985 मध्ये 149 आणि 1980 मध्ये 141 मिळवलेल्या जागांचा विक्रम कायम ठेवता येईल.

AAP Arvind Kejariwal
Chitra Wagh; गर्दी नसल्याने चित्रा वाघ पदाधिकाऱ्यांवर संतापल्या!

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया निकालाबद्दल बोलले की, सध्याच्या परिस्थितीची तुलना 1990 च्या परिस्थितीसारखी आहे. काँग्रेसची निराशाजनक कामगिरी, तुटलेला विरोध, जिथे भाजप आणि जनता दलाला उमेदवार शोधणेही कठीण जात होते आणि आमच्या जागा 149 वरून 33 वर आल्या. " 1990 मध्ये जी स्थिती काँग्रेसची होती, तीच स्थिती 2022 मध्ये भाजपची आहे आणि त्यामुळे 'आप' पाय रोवू शकते. काही जागांवर हा पक्ष मताधिक्य करणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com