केजरीवालांवर नामुष्की; भाजपच्या दणक्यानंतर उचललं मोठं पाऊल

चार दिवसांतच दोन प्रदेशाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने आपला मोठा धक्का बसला आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने आम आदमी पक्षाला (AAP) मोठं खिंडार पाडलं आहे. पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राज्यातून पाठ फिरवताच अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पक्षाला भगदाड पडल्याने केजरीवालांवर थेट राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्याची नामुष्की ओढवली आहे.

आपचे प्रदेशाध्यक्ष अनुप केसरी आणि संघटन सचिव सतीश ठाकूर आणि उनाचे जिल्हाध्यक्ष इकबालसिंह यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. तर सोमवारी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ममता ठाकूर व उपाध्यक्ष सोनिया बिंदल यांच्यासह उद्योक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे प्रवेशही अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीतच झाले.

Arvind Kejriwal
जगनमोहन यांना धक्का; मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच माजी गृहमंत्र्यांचा आमदाकीचाही राजीनामा

चार दिवसांतच तीन प्रदेशाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर पक्षानं मोठं पाऊल उचललं आहे. पक्षाने आता राज्य कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नवी कार्यकारिणी नियुक्त केली जाईल, अशी माहिती पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांनी दिली. दरम्यान, पक्ष सोडल्यानंतर केसरी यांनी टीका केली होती. केजरीवाल यांनी आमची निराशा केली आहे. आम्ही पक्षसाठी रात्रंदिवस काम करतोय आणि त्यांनी आमच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. मंडी झालेल्या रोड शोमध्ये फक्त अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाच मानाचं स्थान होतं, असा दावा केसरी यांनी केला होता. केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांचा अपमान केल्यानं त्यांनी पक्ष सोडला आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला होता.

हिमाचल प्रदेशमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा रोड शो झाला होता. यानंतर राज्यातील आपमध्ये मोठं वादळ उठलं आहे. केजरीवालांनी कार्यकर्त्यांचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून गदारोळ सुरू असतानाच आपचे प्रदेशाध्यक्ष केसरी हेच आता भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. यामुळे पंजाबनंतर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नाला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com